अटल बिहारी वाजपेयींचं निधन, पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

Updated: Aug 16, 2018, 11:09 PM IST
अटल बिहारी वाजपेयींचं निधन, पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया title=

इस्लामाबाद : भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वाजपेयी हे 93 वर्षांचे होते. वाजपेयींच्या निधनानंतर पाकिस्तानचे निर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयींनी केलेले प्रयत्न कायमच लक्षात राहतील. अटल बिहारी वाजपेयी हे दक्षिण आशियातील उत्तुंग नेते होते, असं इम्रान खान म्हणाले. 

अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत-पाकिस्तानमधले संबंध सुधारण्याची जबाबदारी घेतली होती. अटलजींच्या मृत्यूमुळे दक्षिण आशियामध्ये राजकीय पोकळी निर्माण होईल. राजकीय मतभेद असले तरी दोन्ही देशांमध्ये शांतता असली पाहिजे. या कठीण काळामध्ये आम्ही भारतासोबत आहोत, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे.