मुंबई: महिला खासदारनं कॅमऱ्यासमोर पुरुष खासदाराच्या चांगलीच कानशिलात लगावली. इतकच नाही तर चक्क मारहाण करण्यापर्यंत पोहोचली. हा सगळ्या प्रकार लाईव्ह शोदरम्यान सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार ही खासदार महिला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय नेते डॉ फिरदौस आशिक अवान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फिरदौस टीव्ही शोच्या रेकॉर्डिंग दरम्यान पाकिस्तानी खासदाराला थोबडवताना दिसत आहेत. खासदार बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे कादिर मंडोखेल असं पीडित खासदाराचे नाव आहे.
कार्यक्रम सुरू असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निकटवर्तीय अशलेल्या फिरदौस यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी खासदाराच्या कानशिलात लगावली. त्यांची दादागिरी कॅमेऱ्यासमोर उघड झाली आहे.
Dr Firdous Ashiq Awan slaps PPP MNA Qadir Mandokhel during a TV show’s recording. pic.twitter.com/vRIJ7RcJIf
— Murtaza Ali Shah (@MurtazaViews) June 9, 2021
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्यक्रमा दरम्यान दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि संतापलेल्या फिरदौस यांनी खासदाराला थोबडवलं. इतकच नाही तर मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्या इम्रान खान यांच्या निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
— Dr. Firdous Ashiq Awan (@Dr_FirdousPTI) June 9, 2021
हे प्रकरण तापल्यानंतर फिरदौस यांनी घडलेल्या घटनेवर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग दरम्यान ही घटना घडली आहे. कानशिलात लगावण्यावरून झालेल्या गदारोळानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
पीपीपी खासदार कादिर मंडोखेल यांनी त्यांना आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली व धमकी दिली. त्यामुळे संतापातून हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला. फिरदौस आशिक अवान यांनी सांगितले की, कादिर मंडोखेलने त्यांना असे करण्यास भाग पाडले. मांडोखेल यांच्या विरोधात मानसिक छळाचा गुन्हा दाखल करणार आहेत.