पाकिस्तानी नेत्याचं पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना समर्थन करणारं ट्विट

भारताच्या राजकारणात पाकिस्तानची ढवळाढवळ

Updated: Sep 24, 2018, 12:48 PM IST
पाकिस्तानी नेत्याचं पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना समर्थन करणारं ट्विट title=

इस्‍लामाबाद : पाकिस्‍तानने भारताच्या राजकारणात घुसखोरी करण्याची तयारी सुरु केली आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी ट्विट करत काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी यांचं कौतूक करत राहुल गांधी भारताचे पुढचे पंतप्रधान बनणार असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्‍तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यावर देखील टीका केली आहे.

मलिक यांनी राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर देखील केला आहे. 'राहुल यांचा सुंदर व्हिडिओ असं देखील त्यांनी सोबत म्हटलं आहे.

 

काँग्रेसकडून निंदा, पण राहुल भविष्‍यातील पीएम

दुसरीकडे काँग्रेसने पाकिस्‍तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्या वक्तव्याची निंदा केली आहे. काँग्रेस नेते राशिद अल्‍वी यांनी म्हटलं की, 'आम्ही पाकिस्‍तानकडून कोणत्याही प्रकारचा प्रचार मागितलेला नाही. जगाला माहित आहे की, राहुल गांधी भविष्‍यात पंतप्रधान होतील. आम्ही रहमान मलिक यांच्या वक्तव्याची निंदा करतो. पंतप्रधान मोदींसोबत आमचे मतभेद असले तरी ते आमचे पंतप्रधान आहेत.'

याआधी फ्रांससोबत राफेल डीलवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्‍यारोप सुरु असताना पाकिस्तानने देखील या वादात उडी घेतली होती. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी शनिवार ट्विट करत म्हटलं होतं की, भारतातील सत्तेत असणारे लोकं युद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पीएम नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्य़े द्वेष पसरवला जात आहे. राफेल डीलवर पंतप्रधान मोदींवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. यामुळे भारत सरकार भारतीय जनतेला भडकवत आहे.'

राहुल गांधी पाकिस्तानची मदत करतायेत : रविशंकर प्रसाद

याआधी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधीवर पाकिस्‍तानची मदत करत असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर आरोप करत स्वत:वर चिखल ओढून घेत असल्याची टीका त्यांनी केली होती. राहुल गांधी यांनी खोटे आणि बेजबाबदार वक्तव्य करत राष्ट्रीय सुरक्षेची खेळणं बंद करावं. ते पुन्हा पुन्हा राफेल विमानांची किंमत काढून पाकिस्तानला मदत करत आहेत. राहुल गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान दोघे ही पंतप्रधान मोदींसाठी एकाच भाषेचा वापर करत आहेत.