close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाकिस्तानला 'डार्क ग्रे'मध्ये जाण्याची भीती, सुधारण्याची शेवटची संधी

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा एकदा झटका बसला आहे. 

Updated: Oct 15, 2019, 08:26 AM IST
पाकिस्तानला 'डार्क ग्रे'मध्ये जाण्याची भीती, सुधारण्याची शेवटची संधी

पॅरीस : पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा एकदा झटका बसला आहे. फायनांशिअल एक्शन टास्क फोर्सच्या (FATF) बैठकीत पाकिस्तानला कोणत्याच बाजुने समर्थन मिळत नाही आहे. त्यामुळे पाकिस्तान एकाकी पडला आहे. एफएटीएफचे सदस्य असलेल्या कोणत्याही देशाचे पाकिस्तानला समर्थन मिळत नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानला 'डार्क ग्रे' यादीत टाकले जाऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानला सुधरण्याची ही शेवटची संधी आहे. १८ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या बैठकीत २०० हून अधिक देश आणि संघटना सहभागी झाल्या आहेत. 

एफएटीएफच्या निेयमांनुसार ग्रे आणि ब्लॅक यादीच्या मध्ये डार्क ग्रे कॅटगरी देखील असते. डार्क ग्रेचा अर्थ स्पष्ट ताकीद असा होतो. त्यामुळे संबंधित देशाला सुधारण्याची शेवटची संधी मिळू शकते. 

दहशतवादी फंडींग आणि दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई न करण्यामुळे पाकिस्तानला कोणत्याही देशाचे समर्थन मिळत नाही. २७ पैकी ६ गुणांवरच पाकिस्तान असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. एफएटीएफ यावर कडक कारवाई करु शकते. एफएटीएफ १८ ऑक्टोबरला पाकिस्तानवर अंतिम निर्णय घेणार आहे. 

एफएटीएफने जून २०१८मध्ये पाकिस्तानला ग्रे यादीत टाकले होते आणि यातून बाहेर येण्यासाठी सप्टेंबर २०१९ पर्यंत २७ योजना दिल्या होत्या.