Pakistan love story : 19 वर्षीय तरुणीसोबत 70 वर्षाच्या वृद्धाने केला विवाह; म्हणाला, 'रोमान्समध्ये...'

Pakistan love story : पाकिस्तानातील एका 19 वर्षांच्या तरुणीने आपल्यापेक्षा 51 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी विवाह केलाय

Updated: Nov 20, 2022, 12:53 PM IST
Pakistan love story : 19 वर्षीय तरुणीसोबत 70 वर्षाच्या वृद्धाने केला विवाह; म्हणाला, 'रोमान्समध्ये...' title=

प्रेमाला (Love) वयाचं बंधंन नसतं असं म्हणतातय. पण वयाचं अंतर ठेवून प्रेमात पडणाऱ्यांचीही संख्या कमी नाहीये. ही जोडपी शेवटी विवाहबद्ध (marriage) होऊन आपल्या प्रेम किती खरंय याचं उदाहरण ठेवत असतात. अशाच काहीशा प्रेमकथेमुळे अनेकांना धक्का बसलाय. पाकिस्तानातील (Pakistan love story) एका 19 वर्षांच्या तरुणीने आपल्यापेक्षा 51 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी विवाह केलाय. या विवाहामुळे हे जोडपे सध्या चर्चेत आलय.

विवाहबद्ध जोडप्यांमध्ये साधारण वयाचे 5 ते 6 वर्षांचे अंतर असल्याचे पाहायला मिळत. पण जर हे अंतर 51 वर्षे असेल तर अशा विवाहाला काय म्हणायचे? पाकिस्तानात आजोबा आणि नातवासारखी दिसणारी पती-पत्नीची ही सध्या जोडी चर्चेत आहे. या जोडप्याची मुलाखत पाकिस्तानच्या एका यूट्यूब चॅनलवर व्हायरल झाली आहे.

पाकिस्तानी युट्युबर सय्यद बासित अली यांनी ही प्रेमकथा जगासमोर आणली आहे. 19 वर्षांच्या शुमैला आणि 70 वर्षांच्या लियाकत अली विवाहबंधनात अडकले आहेत. लाहोरमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान त्यांची भेट झाली होती. शुमैलाने सांगितले की, प्रेम हे वय बघत नाही, ते फक्त होतो. माझ्या घरच्यांनीही सुरुवातीला या नात्याला विरोध केला, पण नंतर त्यांनी होकार दिला. विवाहात प्रत्येक गोष्टीपेक्षा आदर आणि प्रतिष्ठा असते. त्यामुळे, योग्य व्यक्तीशी विवाह करणे कधीही चांगले.

रोमान्समध्ये वयाला महत्त्व नाही - लियाकत

लियाकत म्हणाले की, "मी 70 वर्षांचा असूनही मनाने खूप तरुण आहे. जेव्हा रोमान्सचा प्रश्न येतो तेव्हा वय किती आहे याचा काही फरक पडत नाही. मी पत्नीच्या स्वयंपाकाने इतका आनंदी आहे की रेस्टॉरंटमध्ये खाणे सोडले आहे. वृद्ध किंवा तरुण असण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याला कायदेशीररित्या लग्न करण्याची परवानगी आहे तो विवाह करू शकतो.