शोएबनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूची भारतीय मुलीशी लग्नगाठ

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली हा भारतीय वंशाची असणारी शामिया आरजू हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला...

Updated: Aug 22, 2019, 10:51 PM IST
शोएबनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूची भारतीय मुलीशी लग्नगाठ title=

मुंबई : पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली हा भारतीय वंशाची असणारी शामिया आरजू हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. हे लग्न दुबईत झालं.  सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. एकीकडे कलम ३७० रद्द झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे भारताच्या या तरूणीशी पाकिस्तानचा क्रिकेटर हसन अली याने लग्नगाठ बांधली आहे.

हसन हा मंगळवारी शामिया आरजू हिच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकला. हा लग्नसोहळा दुबईमधील अटलांटिस पाम जुमेरा पार्क या हॉटेलमध्ये पार पडला. त्यानंतर या दोघांचे फोटो सोशल मीडियावर झटकन व्हायरल झाले. 

 

Hassan Ali and Shamia Arzoo

 

शामिया ही हरियाणामधील नंहू या जिल्ह्यातील चंदेल या गावाची रहिवाशी आहे. शामिया एमिराईट्स या विमान कंपनीत वैमानिक अभियंता म्हणून काम करते. शामियाचे बरेच नातेवाईक हे पाकिस्तानात वास्तव्य करतात, त्यामुळे तिचे पाकिस्तानात लग्न ठरविण्यात आल

पाकिस्तानी क्रिकेटर हसन याने लग्नाच्या एक दिवस आधीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे हसन हा चर्चेत आला आहे. हसन याने लग्नानंतर सेलिब्रेशन करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आह

यापूर्वी देखील भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने देखील, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकबरोबर विवाह केला होता. अशा अनेक सोयरीक भारत आणि पाकिस्तानमध्ये झाल्या आहे.