नवी दिल्ली : भारतात झालेल्या लोकसभा निवडणूक आणि त्याचा निकाल याची जगभरात चर्चा झाली. पाकिस्तानात देखील याची चर्चा होती. पाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये पंतप्रधान मोदींच्या विजयाची बातमी पहिल्या पानावर होती. अनेक संपादकीय आणि विश्लेषणांमध्ये मोदींचा उल्लेख होता.
पाकिस्तानच्या 'द न्यूज' वृत्तपत्रांमध्ये पीएम मोदी यांचं पुन्हा सरकार आल्याने त्यात म्हटलं आहे की, मोदी यांच्या शानदार विजयानंतर भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरु झाला आहे. विरोधी पक्ष आणि 20 कोटी मुस्लमी समुदायासाठी हा निकाल असहज आहे. जेव्हा अयोध्या आंदोलन सुरु होतं तेव्हा देखील भाजपला बहुमत मिळालं नव्हतं. पण २०१९ च्या विजयाचं श्रेय पीएम मोदी आणि अमित शहा यांनाच जातं.
वृत्तपत्रांमध्ये म्हटलं आहे की, 'हिंदू समुदायाला एकत्र करत आणि मुस्लिमांच्या विरोधात भडकवत भाजपने हा विजय मिळवला आहे. भारतात या सरकारमुळे संविधान आणि लोकशाही संस्था बदलेल आणि न्यायपालिका तसेच प्रशासनात मुस्लिमांचं प्रतिनिधीत्व कमी होईल.'
पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने 'After Modi’s win' या शीर्षकासह संपादकीय छापलं आहे. त्यात त्यांनी, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला संदेश दिला आहे की, 'भारतात संप्रदायिक राजकारणाचा विजय झाला आहे. भविष्यात याचा प्रभाव देखील जानवेल. आक्रमक राष्ट्रवादावर भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली. यावरुन असं दिसतं की, धर्माच्या नावावर कसं लोकांना आकर्षित केलं जावू शकतं. मोदींचा संपूर्ण प्रचार हा पाकिस्तान विरोधी होता. राष्ट्रवादाला आणखी भडकवण्यासाठी त्यांनी एअर स्ट्राईक देखील केली.'
'मोदी आता मुस्लीम समुदायाला असुरक्षित ठेवणाऱ्या हिंदू संघटनांना प्रोत्साहन देणार नाहीत. तसेल शांती स्थापित करतील अशी आशा आहे.'