इम्रान यांच्या 'जीवघेण्या स्माईल'वर पाकिस्तानी मंत्री गुल वजीर फिदा

गुल वजीर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खास अंदाजात केली स्तुती 

Updated: Jan 27, 2020, 06:54 PM IST
इम्रान यांच्या 'जीवघेण्या स्माईल'वर पाकिस्तानी मंत्री गुल वजीर फिदा

कराची : पाकिस्तानमध्ये एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये जलवायु परिवर्तन राज्य मंत्री जरताज गुल वजीर या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खास अंदाजात स्तुती करताना दिसत आहे. यामध्ये इम्रान खान यांच्यावर स्तुती सुमनं वाहताना 'कातिल मुस्कराहट'  (जीवघेणं हास्य) अशा शब्दात वर्णन करताना दिसत आहेत. या व्हिडीओत जरताज गुलने इम्रान खान यांना करिश्मा करणारी व्यक्ती म्हणून संबोधले आहे. तसेच इम्रान यांच्या जीवघेणं हास्यासोबतच बॉडी लॅंग्वेजची प्रशंसा करताना दिसल्या. 

जर तुम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्या बॉडी लॅंग्वेजबद्दल बोलत असाल तर मला वाटतं ते सर्वात भारी आणि करिश्मा करणारे व्यक्ती आहेत. ते आपल्या जीवघेण्या स्माईलने एखादी समस्या हाताळतात. बैठकीत सहभागी होतात तेव्हा देखील त्यांचा करिश्मा वेगळा असतो.

इम्रान यांच्या स्तुतीवर गुल या सोशल मीडियात ट्रोल झाल्या आहे. त्यांच्या या व्हिडीओवर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. या पूर्ण जगात गुल याच काम नसलेल्या महिला मंत्री आहेत. बॉलिवुडमध्ये सलमान खान जसा अभिनय करतो तसे तुम्ही पंतप्रधानांना तयार करा असो खोचक सल्ला देखील एका युजरने दिला. सुंदर आहेत..पंतप्रधानांकडून तुम्हाला आणखी काय हवंय असे ट्वीट देखील एका युजरने केले आहे.