मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत देशात आक्रोश आहे. जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहरात पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे डिझेलची किंमतही कमी नाही. त्याच वेळी, जगातील पेट्रोलियम संपत्तीने समृद्ध असलेल्या अनेक देशांमध्ये इंधनाच्या किंमती इतक्या कमी आहेत की, तुम्हाला त्याच्या किंमती जाणून विश्वासच बसणार नाही. आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जेथे तुम्ही अगदी 50 रुपयात कारची टाकी फुल करु शकता. हो तुम्ही बरोबर ऐकलात, हे असं शक्य आहे ते व्हेनेझुएलामध्ये.
या देशात तुम्हाला फक्त 50 रुपयांमध्ये कारची टाकी पूर्ण मिळू शकते, तर या पैशात भारतात तुम्हाला अर्धा लिटर तेलही मिळणार नाही. खरं तर, व्हेनेझुएलामध्ये प्रदीर्घ राजकीय गोंधळामुळे, परिस्थिती अशी बनली आहे की, जे सामान्य आहे आणि जे विशेष आहे ते सर्वांना आश्चर्यचकित करते. येथे तुम्ही भारतीय रुपयात बाइकमध्ये फक्त 21 पैसे खर्च करून तुमच्या बाईकमध्ये एक लिटर पेट्रोल टाकू शकता.
एनर्जी सेक्टरच्या वेबसाइट www.globalpetrolprices.com नुसार, व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलची किंमत फक्त $ 0.02 आणि डिझेलची किंमत ऐकल्यावर तर तुमचाही विश्वास बसणार नाही कारण ते $ 0 मध्ये विकले जात आहे.
व्हेनेझुएलाच्या चलनात पेट्रोलची किंमत 5000 बोलिव्हर प्रति लिटर आहे. त्यामुळे जर तुम्ही त्याला भारतीय रुपयांमध्ये $ 0.02 विभाजित केले तर ही किंमत फक्त दीड रुपये आहे. दुसरीकडे, जर तुम्ही बोलिव्हरची तुलना भारतीय चलनाशी केली तर ही किंमत फक्त 21 पैसे प्रती लिटर आहे. याचे कारण असे की, अलीकडील एक्सचेंज रेटनुसार, सध्या 23733.95 बोलिव्हर एका भारतीय रुपयामध्ये मोजले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला देशात अनेकदा पेट्रोलची किंमत खूप कमी असते. तथापि, यापूर्वीही, भारतातील रेल्वेमध्ये उपलब्ध असलेल्या रेल्वे नीरच्या पाण्याच्या बाटलीपेक्षा इकडच्या एक लिटर इंधनाची किंमत कमी आहे.
आमची सहयोगी वेबसाइट झी बिझनेस मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, जेव्हा इतर काही देशांमध्ये स्वस्त पेट्रोल मिळण्याची गोष्ट येते, तेव्हा इराण दुसऱ्या क्रमांकावर येते. जिथे तुम्हाला सर्वात स्वस्त पेट्रोल मिळू शकते.
त्याचप्रमाणे सुदान, कतार, कझाकिस्तान, तुर्कस्तान, नायजेरिया, कुवैत, अल्जेरिया, अंगोला यांसारख्या इतर 8 देशांमध्ये प्रवास करताना तुम्हाला स्वस्त पेट्रोल मिळू शकते. या देशांमध्ये एक लिटर पेट्रोल टाकणे भारताच्या तुलनेत टॉफी-चॉकलेट खरेदी करण्याइतकेच स्वस्त आहे.