कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधल्या सह्याद्रीच्या मावळ्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या सर्वोच्च पर्वतावर अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.
तब्बल सहा दिवसांच्या मोहिमेत दक्षिण आफ्रिकेतल्या 5895 मीटर उंचीवरच्या माउंट किलीमांजरो पर्वत शिखरावर ही शिव जयंती साजरी झाली.
आफ्रिका खंडातल्या टांझानियामधला माऊंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडातला सर्वात उंच पर्वत... गोठवणारी थंडी, सुसाट वारा या आव्हानांना पार पाडत पिंपरी चिंचवडच्या अनिल वाघ, क्षितीज भावसार आणि रवि जांभूळकर या मावळ्यांनी किलीमांजारो सर केला... भगवा झेंडा फडकावत आणि महाराजांची मूर्ती तिथे नेऊन त्याला वंदन करत अनोख्या पद्धतीने त्यांनी शिवजयंती साजरी केली.
राज्यातच नाही तर जगात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने या मावळ्यांनी दक्षिण आफ्रिकेत शिव जयंती साजरी केली.