वॉशिंग्टन : पंतप्रधान मोदी (PM modi) 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा अमेरिका दौरा (USA visit) ऐतिहासिक असणार आहे. गुरुवारी सकाळी ते वाशिंगटन डीसी येथे पोहोचले. पीएम मोदी आज अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Vice President Kamala Harris) यांची भेट घेणार आहेत. या शिवाय ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसर(Scott Morrison) आणि 5 मोठ्या कंपन्यांच्या सीईओ यांची ही भेट घेणार आहेत. पीएम मोदी ज्या CEO ना भेटणार आहेत. त्यामध्ये एक नाव शांतनू नारायण (shantanu narayen) यांचं आहे. शांतनू एडॉब ( ADOBE) चे चेअरमन आहेत.
शांतनु नारायण यांचा जन्म 27 मे 1963 रोजी आंध्रप्रदेशच्या हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील प्लास्टिक कंपनी चालवायचे आणि आई अमेरिकन लिटरेचर विषयाच्या शिक्षिका होत्या. हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उस्मानिया यूनिवर्सिटी येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंगमध्ये बीटेक केलं.
शांतनू नारायण ADOBE INC चे चेयरमैन, प्रेसीडेंट आणि CEO आहेत. ते जगातील सर्वात अधिक पगार घेणाऱ्या भारतीयांच्या यादीत आहेत. 2020 मध्ये ADOBE INC कडून दिलेल्या proxy statementsनुसार शांतनू नारायण यांना 2020 मध्ये 45,889,954 डॉलर compensation मिळालं होतं. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 341 कोटी रुपये इतकी आहे.
एडोबीचे सीईओ शांतनू नारायण हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. भारतात देखील त्यांचा व्यवसाय आहे. कंपनीचे ऑफिस बंगळुरु, नोएडा आणि गुरुग्राम या ठिकाणी आहे. भारतातील एडॉब कंपनीत जवळपास 6 हजार लोकं काम करतात.
अमेरिकेत देखील या कंपनीचं मोठं नाव आहे. याआधी ही कंपनी Adobe Systems Incorporated नावाने ओळखली जात होती. कंपनीचं हेडक्वार्टर कॅलिफोर्निया येथे आहे. ही कंपनी कंटेंट क्रिएशन आणि डिजाइनिंगसाठी वापरण्यात येणाऱे सॉफ्टवेअर बनवते.
1998 मध्ये नारायण यांनी एडॉब कंपनी ज्वाईन केली होती. 2001 मध्ये ते एक्जिक्यूटिव वाइस प्रेजिडेंट बनले. नोव्हेंबर 2017 मध्ये जेव्हा Bruce Chizen यांनी CEO पद सोडले तेव्हा शांतनू नारायण हे नवे CEO नियुक्त झाले. कंपनीचे प्रोडक्ट्सला त्यांनी डेस्कटॉपवरुन क्लाउडवर आणलं.
शांतनू नारायण यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 11 मार्च, 2019 ला दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले होते.