पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात महत्त्वाची भेट

जगभरातील चालू असलेल्या गोंधळाच्या दरम्यान ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात स्वतंत्रपणे भेट झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर जग दोन गटांमध्ये वाटलं जात असतांना पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांची बैठक होत आहे. उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी जपान, अमेरिकेसह इतर शक्तीशाली देश तयारी करत असतांना रशिया आणि चीन यांनी मात्र याला विरोध केला आहे.

Updated: Sep 4, 2017, 05:09 PM IST
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात महत्त्वाची भेट title=

श्यामॅन : जगभरातील चालू असलेल्या गोंधळाच्या दरम्यान ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात स्वतंत्रपणे भेट झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर जग दोन गटांमध्ये वाटलं जात असतांना पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांची बैठक होत आहे. उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी जपान, अमेरिकेसह इतर शक्तीशाली देश तयारी करत असतांना रशिया आणि चीन यांनी मात्र याला विरोध केला आहे.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील चर्चा यासाठी देखील महत्त्वाची होती की, चीनला डोकलामच्या मुद्दयावर माघार घ्यावी लागली आणि भारताने कठोर शब्दात पाकिस्तानमधील दहशतवादावर मत मांडलं. जहशतवाद्याच्या या लढाईत रशियाची साथ भारतासाठी महत्त्वाची ठरु शकते.