King Cobra Attack Video: सर्पमित्र सोडले तर आपल्यापैकी अनेकांना साप समोर दिसला की बोबडी वळते. काही जण साप दिसला तरी आपला मार्ग बदलतात. साप हा विषारी सरपटणारा प्राणी असल्याने अनेक जण त्याच्या वाटेला जात नाहीत. सापांच्या विविध प्रजातींमध्ये किंग कोब्रा हा सर्वात धोकादायक मानला जातो, तर रॅटलस्नेक दुसऱ्या क्रमांकावर येतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, दरवर्षी सुमारे 81,000 ते 1,38,000 लोक साप चावल्यामुळे मरतात. मात्र काही जणांना याची जराही भीती वाटत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चँडलर्स वाइल्ड लाईफ नावाच्या युट्यूब चॅनलने 3 वर्षांपूर्वी यूट्यूबवर अपलोड केलेला व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.
व्हिडीओतील व्यक्ती किंग कोब्रा आणि रॅटलस्नेक या दोन सर्वात विषारी सापांना आंघोळ घालताना दिसत आहे. व्हिडीओतील सर्पमित्राने सापाच्या पिंजऱ्यातून पेटी बाहेर काढतो. त्याने पेटीचे झाकण उघडतो आणि आतून एक महाकाय किंग कोब्रा बाहेर काढतो. तसेच पाण्याने भरलेल्या टबमध्ये ठेवतो. त्यानंतर पिंजऱ्याच्या एका कोपऱ्यावर रेंगाळणार्या रॅटलस्नेककडे लक्ष देतो. काठीने हळूहळू रॅटलस्नेक बाहेर काढतो आणि पाण्याने भरलेल्या दुसऱ्या टबमध्ये ठेवतो.
30 मिनिटांनंतर सर्पमित्र बाथटबमधून साप काढतो आणि त्यांना पुन्हा त्यांच्या पिंजऱ्यात ठेवतो. नेटकऱ्यांनी सर्पमित्राच्या पराक्रमाचे कौतुक केले. एका युजरने लिहिले की, 'मला हा माणूस आवडतो, मुळात दोन विषारी साप हाताळूनही विनोद करत आहे आणि मजा करत आहे.' दुसरा युजर्स म्हणाला की, 'हा माणूस एक दिवस व्हिडीओ बनवणे बंद करेल, तेव्हा आम्हाला समजून जाईल.'