ह्यूस्टन : अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यूस्टन येथे काश्मीरी पंडीतांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. यावेळी काश्मीरी पंडीतांसोबत पंतप्रधान मोदी यांनी नमस्ते शारदा देवी हा संस्कृतचा श्लोक वाचला. याआधी अमेरिकेच्या शिख समुदायाने ह्यूस्टन येथे पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. दिल्लीच्या आयजीआय विमानतळाचे नाव बदलून गुरु नानक देव आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
#WATCH United States: Prime Minister Narendra Modi joins in reciting 'Namaste Sharade Devi' shloka while the Kashmiri Pandits meeting and interacting with him also recite it, in Houston. pic.twitter.com/pXZdAuvEvG
— ANI (@ANI) September 22, 2019
शिख समुदायाना आपल्या मागण्यांचे एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. 1984 च्या शिख दंगली, भारतीय संविधान कलम 25 आणि आनंद विवाह कायदा. व्हिसा, पासपोर्ट रिन्यू्अल अशा विषयांचा उल्लेख या पत्रात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्यूस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अमेरिकन राष्ट्रपती डोनल्ड देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडीअममध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेत भारतीय समुदायातील साधारण पन्नास हजार जण सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाबद्दल जनतेमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे होर्डींग्ज्स लागले आहेत.
हाऊडी मोदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 1100 हून अधिक स्वयंसेवक रात्रंदिवस एक करुन काम करत आहेत. अमेरिकेतील 48 राज्यांतील भारतीय समुदाय पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी ह्यूस्टन येथे पोहोचत आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमात 60 हून अधिक अमेरिकन सासंद सहभागी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीचा सांस्कृतिक कार्यक्रम साधारण 90 मिनिटांचा असेल. या सांस्कृतिक कार्यक्रमात भारत-अमेरिकी समुदायाची विविधता दिसून येईल.
टेक्सास आणि पूर्ण अमेरिकेतील 400 कलाकार 17 ग्रुप्समधून यामध्ये सहभागी होतील. स्टेडीयममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकार नॉनस्टॉप कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा बजेट वाढवून 2.4 मिलियन डॉलर करण्यात आला.