राजकुमारीचे बॉडीगार्डशी संबंध, तोंड बंद ठेवण्यासाठी दिले १२ कोटी

जॉर्डनची (Jordan) राजकन्या आणि नंतर दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम याची सहावी पत्नी हया बिन्त हुसैन (Princess Haya bint Hussein) हिचे तिच्या बॉडीगार्डशी (Bodyguard) प्रेमसंबंध (love affair) होते.  

Updated: Nov 21, 2020, 08:22 PM IST
राजकुमारीचे बॉडीगार्डशी संबंध, तोंड बंद ठेवण्यासाठी दिले १२ कोटी   title=
Pic Courtesy: Daily Mail (AP-Archives)

लंडन : जॉर्डनची (Jordan) राजकन्या आणि नंतर दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम याची सहावी पत्नी हया बिन्त हुसैन (Princess Haya bint Hussein) हिचे तिच्या बॉडीगार्डशी (Bodyguard) प्रेमसंबंध (love affair) होते. त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र, ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवण्यासाठी राजकुमारी हया हिने त्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले. 

अंगरक्षकांशी असलेले संबंध लपविण्यासाठी तब्बल १२ कोटी रुपये तिला मोजावे लागल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम  (Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum) यांने आपल्या या सहाव्या पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा देण्याबाबत ब्रिटनच्या न्यायालयात घटला सुरु आहे. याबाबतची सुनावणी सुरु होती. या याचा हवाला देत 'डेली मेल'ने हे वृत्त दिले आहे.

शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांने हयाला तलाक दिला होता. राजकुमारी हया हिला काहीही न सांगता शरिया कायद्यानुसार राजाने तलाक दिला. २०१६ ते २०१८ दरम्यान, राजकुमारी हया हिचे प्रेमसंबंध होते. तिचा बॉडीगार्ड राजकुमारी हयासाठी तो काम करु लागला. ४६ वर्षीय राजकुमारी हया हिचे ब्रिटनच्या ३७ वर्षीय बॉडीगार्ड रसेल फ्लॉवर (Bodyguard Russell Flawer) याच्यासोबत तब्बल दोन वर्ष संबंध होते. 

रसेलशी असलेले संबंध लपवून ठेवण्यासाठी प्रिन्सेस हयाने अन्य तीन अंगरक्षकांना कोट्यवधी रुपये दिले. राजकुमारी हया तिच्या बॉडीगार्डला खूप महागड्या भेटवस्तू देत असे. ज्यामध्ये १२ लाखांची घड्याळ आणि ५० लाखांची बंदुक यासारख्या महागड्या वस्तूंचा समावेश आहे. तथापि, दुबईच्या राजाने राजकुमारी हयाला न सांगता शरिया कायद्यांतर्गत फेब्रुवारी २०१९ मध्ये तिला घटस्फोट दिला.

२०१८ मध्ये राजकुमारी हया हिने दुबई सोडली आणि लंडन गाठले. ती लंडनमध्ये राहू लागली. बर्‍याच वर्षांपासून ती यूकेमध्ये राहत आहे. मुलांता ताबा  घेतण्यासाठी राजकुमारी हयाने यूकेच्या कोर्टात खटला दाखल केला होता आणि हयाच्या बाजूने हा निकाल लागला.