सीताहरण करणारा रावण जगातील पहिला पायलट; पाहा कोण करतंय हा दावा

पुराव्यांनिशी संशोधन सुरु

Updated: Nov 17, 2021, 12:43 PM IST
सीताहरण करणारा रावण जगातील पहिला पायलट; पाहा कोण करतंय हा दावा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

कोलंबो : जगातला पहिला पायलट कोण होता, असा प्रश्न तुम्हाला विचारला असता, तुम्ही काय उत्तर द्याल? याचसंदर्भात सध्या श्रीलंकेमध्ये याचसंदर्भात एक निरिक्षण सुरु आहे. ज्याच्या बळावर रावण हा जगातील पहिला वैमानिक अर्थात पायलट असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

रावणानं सीतेला पळवलं आणि तो पुष्पक विमानातून सीतेला लंकेला घेऊन गेला. रामानं रावणाला मारल्यानंतर याच पुष्पक विमानातून राम, लक्ष्मण, सीता अयोध्येला आले, असं रामायण सांगतं.

रावणाचं पुष्पक विमान ही निव्वळ दंतकथा नव्हे, तर जगातलं पहिलं विमान रावणाकडे होतं. 

इतकंच नव्हे तर, रावण हा जगातील पहिला पायलट होता आणि त्याचा श्रीलंका ते भारत; भारत ते श्रीलंका हा पहिला विमान प्रवास होता अशी श्रीलंकेतल्या लोकांची धारणा आहे. 

रावणाच्या याच प्रवासावर संशोधन करण्यासाठी आता श्रीलंकेतील सरकारनं अनुदान दिलं आहे. 

श्रीलंकेतल्या अनेकांनी पुष्पक विमानावर वैयक्तिक संशोधन सुरू केलं आहे. दोन वर्षांपूर्वी हवाई वाहतूक तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि संशोधकांची कोलंबोमध्ये एक कॉन्फरन्स झाली.

कॉन्फरन्समध्ये पुष्पक विमान प्रत्यक्षात होतं, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

जगात पहिल्यांदा रावणाने विमान उडवलं होतं, हे उड्डाण श्रीलंकेतून भारतापर्यंत झालं आणि रावण त्याच विमानानं परत आला, असाही दावा त्यात करण्यात आला.

कॉन्फरन्सनंतर तत्कालीन श्रीलंका सरकारनं पुष्पक विमानाच्या संशोधनासाठी ५० लाखांचं अनुदान दिलं होतं. कोरोना काळात हे संशोधन थांबवावं लागलं.

आता सध्याच्या राजपक्षे सरकारनं या संशोधनासाठी पुन्हा हिरवा कंदील दाखवला आहे.

रामानं लंकेत जाण्यासाठी वानरांकडून जो पूल बांधून घेतला, त्या पुलाचे अवशेषही समुद्राखाली सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधी रावणाच्या सन्मानार्थ रावण नावाचा एक उपग्रहही श्रीलंकेनं अंतराळात पाठवला. 

रावणाकडे विमानासारखं तंत्रज्ञान होतं, ही श्रीलंकेतल्या लोकांची ठाम धारणा आहे. आता या संशोधनातून पुष्पक विमानाचा इतिहास नव्यानं उलगडण्याची शक्यता आहे.