कोट्यवधीच्या हिऱ्यासाठी 2 शाही राजघराणी आमने-सामने, कोर्टात पोहोचला वाद, काय आहे नेमकं प्रकरण?

Royals Fight over Diamond: लाखो डॉलर्स किमतीच्या हिऱ्यांच्या वादामुळे दोन शाही राजघराणी कोर्टात पोहोचली आहेत. कशी झाली वादाला सुरुवात? पाहूयात

नेहा चौधरी | Updated: Nov 12, 2024, 05:15 PM IST
कोट्यवधीच्या हिऱ्यासाठी 2 शाही राजघराणी आमने-सामने, कोर्टात पोहोचला वाद, काय आहे नेमकं प्रकरण? title=
qatar 2 royal families fight over a diamond worth millions of dollars court what is the case

Royals Fight over Diamond : शेख हमद बिन अब्दुल्ला अल थानी यांच्या QIPCO कंपनीकडे 'आयडॉल्स आय' नावाचा हिरा आहे. त्याची किंमत लाखो डॉलर्सच्या घरात आहे. हा हिरा शेख सौदने त्याला उधार दिला होता, असं सांगितलं जातं. आज याच हिऱ्यामुळे कतारमधील 2 शाही राजघराणी कोर्टात पोहोचली आहे. लाखो डॉलर्स किमतीच्या हिऱ्यांच्या वादात दोघेही सोमवारी (11 नोव्हेंबर 2024) लंडन उच्च न्यायालयात पोहोचले. आता या वादावर न्यायालय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचं चुलत भाऊ शेख हमद बिन अब्दुल्ला अल थानी यांनी माजी सांस्कृतिक मंत्री शेख सौद बिन मोहम्मद अल थानी यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. हमाद बिन अब्दुल्ला यांच्या मालकीची कंपनी 70 कॅरेटचे रत्न खरेदी करण्याचा कथित अधिकार लागू करण्याचा प्रयत्न केलाच बोलं जातंय. 

असा सुरु झाला वाद!

शेख सौद हे 1997 ते 2005 दरम्यान कतारचे सांस्कृतिक मंत्री होते. त्यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला आयडॉल आय डायमंड खरेदी केला होता. 2014 मध्ये त्यांचं निधन झालं. मृत्यूच्या काही काळापूर्वी त्यांनी हा हिरा शेख हमद बिन अब्दुल्ला यांच्या QIPCO या कंपनीला दिला होता. यावेळी, त्याने एक करार देखील केला ज्यामध्ये क्यूआयपीसीओला एलानस होल्डिंग्जच्या संमतीने हिरा खरेदी करण्याचा पर्याय देण्यात आला होता. 

शेख सौद यांच्या एलेनस होल्डिंग्स या कंपनीने हा हिरा QIPCO ला दिला होता. एलेनस होल्डिंग्ज आता लिकटेंस्टीन-आधारित अल थानी फाउंडेशनच्या मालकीची आहे, ज्याचे लाभार्थी शेख सौदची विधवा आणि तीन मुलं आहेत. हे पत्र चुकून पाठवण्यात आल्याचा ॲलेन्सचा तर्क आहे. ॲलेन्सचे वकील साद हुसेन यांनी न्यायालयीन दाखल्यांमध्ये सांगितल की शेख सौद यांचा मुलगा शेख हमद बिन सौद अल थानी याने केवळ योग्य किमतीत विक्रीची शक्यता शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फाउंडेशनच्या इतर लाभार्थ्यांशी सल्लामसलत केली नव्हती.

हिऱ्याच्या किमतीबाबत दोन्ही बाजूंमध्ये कोणताही करार...

आता QIPCO ला हा हिरा 10 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घ्यायचा आहे आणि या मुद्द्यावर, QIPCO च्या वकिलांचे म्हणणे आहे की 2020 च्या पत्रात अल थानी फाउंडेशनच्या वकिलांनी आयडॉल आय हिरा 10 दशलक्ष डॉलर्समध्ये विकण्याची तयारी दर्शवली होती, मात्र एलेनस होल्डिंग्सने ते विकत घेतले आहे. या हिऱ्याची किंमत कमी लेखली जात असून त्याची खरी किंमत 27 दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगण्यात आलंय.