Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांच्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स (King Charles III) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते आता पुढचे राज घराण्याचे वारसदार असणार आहे. आज दुपारी 2.30 वाजता नवीन महाराज म्हणून त्यांची घोषणा होणार आहे. (Prince Charles is British throne's next King)
ब्रिटनमधील बालमोरल येथे गुरुवारी 96 वर्षीय एलिझाबेथ यांचे निधन (Queen Elizabeth death) झाल्याची बातमी धडकली. त्यानंतर लगेचच, एलिझाबेथचे खासगी सचिव सर एडवर्ड यंग यांनी ब्रिटीश पंतप्रधान लिझ ट्रस यांना फोन कॉल केला. गेली 70 वर्षे ब्रिटनची गादी सांभाळणाऱ्या महाराणी एलिझाबेथ या जगात राहिलेल्या नाहीत. आता ब्रिटनमध्ये 10 दिवसांचा राजकीय शोक व्यक्त केला जाणार आहे. एलिझाबेथचे स्कॉटलंडमधील बालमोरल येथे निधन झाले. याच ठिकाणी त्यानी आपला बराच कालावधी घालवला. 1852 पासून ही जागा राजघराण्याकडे होती.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या मृत्यूनंतर त्यांची राजगादी त्यांचे सर्वांत मोठे पुत्र चार्ल्स यांच्याकडे गेली आहे. चार्ल्स हे माजी प्रिन्स ऑफ वेल्स आहेत. दरम्यान, त्यांचा राजा म्हणून राज्याभिषेक होण्यासाठी चार्ल्स यांना अनेक व्यावहारिक आणि पारंपरिक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे चार्ल्स हे ब्रिटनच्या सिंहासनावर बसणारे सर्वात वयस्कर राजा असतील. चार्ल्स हे पहिले राजेशाही वारस आहेत त्यांचे घरी शिक्षण झाले नाही. त्याचवेळी, राजघराण्यातील आणि सामान्य जनता यांच्यातील कमी होत चाललेल्या अंतराच्या जमान्यात विद्यापीठातून पदवी मिळवणारे आणि माध्यमांच्या तीक्ष्ण नजरेखाली आयुष्य जगणारे ते पहिले वारसदारही आहेत. किंग चार्ल्स यांचे लंडनमध्ये आगमन झाले आहे, त्यांना शनिवारी औपचारिकपणे ब्रिटनचे नवे राजे घोषित केले जाणार आहे. आज दुपारी राजा चार्ल्स यांचा शपथविधी होणार आहे.
किंग चार्ल्स तिसरे हे आज राष्ट्राला संबोधित केले आहे. त्यांनी त्यांची आई, राणी एलिझाबेथ II यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला . त्यांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान लिझ ट्रस यांचीही भेट घेतली. त्यांची आता पुढचा वारसदार म्हणून नियुक्ती केल्यानंतर ही भेट झाली आहे.
स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथून आगमन होताच बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर जमलेल्या लोकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात, चार्ल्स यांनी आपल्या आईला आदरांजली वाहिली आणि प्रिन्स विल्यमने प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून आपली पूर्वीची पदवी स्वीकारण्याची घोषणा केली. ब्रिटनमध्ये 10 दिवसांचा शोक पाळला जात असताना, देश आणि जग राणीला श्रद्धांजली अर्पण करत आहे.