Sri Lanka New President : आर्थिक संकटासह गृहयुद्धामुळे होरपळत असलेल्या असलेल्या श्रीलंकेला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षाचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे माजी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्याशिवाय देशातील नागरिकांचाही विक्रमसिंघे यांच्या नावाला विरोध होता. राष्ट्राध्यक्ष पदासाठी आणखी तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र विक्रमसिंघे यांचा विजय झाला आहे.
सहा वेळा पंतप्रधान राहिलेले विक्रमसिंघे १३४ मतांनी विजयी झाल्याचे अधिकृत आकडेवारी दर्शवते. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी देशातील जनतेला संबोधित केले. देश अत्यंत कठीण परिस्थितीत आहे. आपल्यासमोर अनेक मोठी आव्हाने आहेत, असे विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे. रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय डॅलस आल्हापेरुमा आणि डाव्या पक्षाच्या जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) नेते अनुरा कुमारा दिसनायके हे देखील निवडणूक लढवत होते.
राजपक्षे यांच्यानंतर विक्रमसिंघे हे काळजीवाहू अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. या निवडणुकीत ८२ मतांसह अल्हपेरुमा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिसानायके यांना केवळ तीन मते मिळाली. याआधी प्रमुख विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांचेही नाव राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत चर्चेत होते, मात्र त्यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याची घोषणा केली होती.
देशात आणीबाणी लागू
देशातील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करण्यात श्रीलंका सरकार अपयशी ठरल्यानंतर, लोक रस्त्यावर उतरले आणि गोताबाया राजपक्षे यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सध्या देशात आणीबाणी लागू आहे.
श्रीलंकेत परिस्थिती आणखी बिघडली
देशात परकीय चलनाच्या साठ्याच्या तीव्र टंचाईमुळे अन्नपदार्थ, इंधन आणि औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर वाईट परिणाम झाला आहे. परकीय कर्ज ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या वर गेले आहे. यावर्षी श्रीलंकेला ७ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे.