खुलासा! उत्तर कोरियाच्या महिला सैनिकांवर होतात बलात्कार

अणुबॉम्ब आणि लष्कराच्या आधारावर उत्तर कोरिया संपूर्ण जगाला आव्हान देत असतो. जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना उत्तर कोरियाकडे आहे. परंतु प्रत्यक्षात आतलं सत्य काही वेगळच आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 23, 2017, 01:38 PM IST
खुलासा! उत्तर कोरियाच्या महिला सैनिकांवर होतात बलात्कार title=

नवी दिल्ली : अणुबॉम्ब आणि लष्कराच्या आधारावर उत्तर कोरिया संपूर्ण जगाला आव्हान देत असतो. जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना उत्तर कोरियाकडे आहे. परंतु प्रत्यक्षात आतलं सत्य काही वेगळच आहे. 

महिला सैनिकांवर अत्याचार

उत्तर कोरियाच्या सैन्याची स्थिती खूपच वाईट आहे. सैनिक कुपोषणाचे बळी ठरत आहेत. एवढेच नाही, तर येथे महिला सैनिकांना जीवन जगत असताना अनेक प्रकारचा छळ सहन करावा लागतो. स्त्रियांचं शोषण होतं. त्यांच्या मासिक पाळीचा कालावधी कोणत्याही क्षणी थांबतो. महिला सैनिकांवर येथे बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

माजी महिला सैनिकाच्या वेदना

एक माजी महिला सैनिकाने आपल्या वेदना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटलं की त्यांचं खूप शोषण केलं जातं. याचा परिणाम म्हणजे महिलाचं मासिक चक्र मध्येच थांबून जाते. लष्करी अधिकारी या महिला सैनिकांचं शोषण करतात. त्यांना राहण्यासाठी खूपच अवघड जागा दिली जाते. सैनिकांना केवळ १ वेळचं जेवण दिलं जातं.

माजी महिला सैनिकाचा धक्कादायक खुलासा

विविध प्रसारमाध्यमांतील अहवालांनुसार, उत्तर कोरियाचे सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी दक्षिण कोरियामध्ये किंवा इतर देशांमध्ये स्थलांतर करत आहेत. एका माजी महिला लष्करी अधिकारी असलेल्या ली सो योनेने सांगितले की, त्या 10 वर्ष उत्तर कोरियाच्या सैन्यात होत्या. ली सो योनेला वयाच्या 17 व्या वर्षी लष्करात भरती करण्यात आले होते. त्याने सांगितले की त्यांच्या घरातील अनेक जण सेन्यात होते. ज्यामुळे त्यांना देखील सैन्यात येण्याची इच्छा झाली. 1990 च्या सुमारास ते सैन्यदलात भरती झाल्या. त्यावेळी त्यांना फक्त एक वेळचे जेवण दिले जात होते. तिथे राहण्यासाठी एक छोटीशी खोली होती. ज्यात 10-12 महिला एकत्र राहायच्या. 

मजुरासारखं केलं जातं काम

ली सू योन यांनी सांगितले की, दिवसभर त्यांच्याकडून काम करुन घेतलं जात होतं. सैनिकांसाठी, स्त्रियांना स्वयंपाक आणि साफसफाईसारखे काम करावे लागत होते. गलिच्छ पाणी पिण्याकरिता दिले जायचे. रात्री झोपण्यासाठी तांदूळाच्या कुजलेल्या पेंढ्या दिल्या होत्या. ज्यांच्यातून खूप घाण वास यायचा. महिलांना मजूर म्हणून काम करायला लावत होते. त्यांचं शारीरिक शोषण केलं जायचं. हिंसा केल्या जायच्या. सैन्यातील स्त्रियांची स्थिती इतकी वाईट होती की त्या काळात त्यांना पुन्हा सॅनिटरी नॅपकिन्स वापराव्या लागत होत्या.

मासिळ पाळी होते बंद

कुपोषणामुळे स्त्रियांचं मासिक पाळी आधीच बंद होऊन जात असे. नोकरीच्या सहा महिन्यांनंतरच त्यांची मासिक पाळी बंद झाली होती. कामकाजाच्या 10 वर्षांत त्या कधीही व्यवस्थित अंघोळ नाही करु शकल्या नाही. अंघोळीसाठी थेट पर्वतावरून पाणी यायचं. ज्यामध्ये कधी साप तर कधी बेडूक यायचे असं त्यांनी सांगितलं.

महिला सैनिकांवर होतात बलात्कार

ली सो योन यांनी सांगितले की, लष्करातील अधिकारी महिला सैनिकांना बोलावून त्यांच्यावर बलात्कार करायचे. या शोषणाला कंटाळून दोनदा त्यांनी सैन्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एकदा त्या पकडल्या गेल्या आणि एक वर्षासाठी तुरुंगात होत्या. दुसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. संपूर्ण रात्र पोहत त्यांनी नदी ओलांडली आणि त्या चीनमध्ये पोहोचल्या.

पुरुष सैनिकही कुपोषणाचे बळी

हे केवळ स्त्रियांच्या बाबतीतच नाही तर पुरुष सैनिकांबाबतीत ही आहे. येथे पुरुष देखील कुपोषणाचे बळी ठरत आहेत. सैनिक सैन्य सोडून जात आहेत. उत्तर कोरियाच्या सैन्यातून पळून जाणाऱ्या दोन जणांना गोळ्या मारण्यात आल्या तर एक जण दक्षिण कोरियामध्ये पळून जाण्यात यशस्वी झाला. वाचवण्यात आलेल्या सैनिकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑपरेशन दरम्यान, जखमी सैनिकांच्या आतड्यामधून 11 इंच लांब जंतू आणि अनेक परजीवी काढण्यात आले. हे सर्व कुपोषणाचे लक्षण आहे.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉँग एक क्रूर शासक म्हणून ओळखला जातो.  तो आपल्या शत्रुंना इतक्या क्रूरतेने शिक्षा करतो की त्या बद्दल कोणी विचार देखील करु शकत नाही.