इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि नेता इम्रान खानची माजी पत्नी रेहम खानच्या आगामी पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा होतेय. दरम्यान हे पुस्तक अजून बाजारात आलेले नाहीये मात्र मार्केटमध्ये येण्याआधी या पुस्तकाने पाकिस्तानच्या राजकारणाला हलवून टाकलेय. रेहम खानने या पुस्तकात असे काही खुलासे केलेत जे येणाऱ्या दिवसांत मोठा धमाका करतील. या पुस्तकात रेहम खान यांनी इम्रानची पहिली पत्नी जेमिमा गोल्ड स्मिथ, वसीम अक्रम, तिचा माजी पती एजाज रेहमान आणि ब्रिटीश बिझनेसमन सय्यद जुल्फिकार बुखारीविरोधात अनेक धक्कादायक खुलासे केलेत.
या पुस्तकाच्या खुलाश्यावर रेहम खानला वसीम अक्रमसह ४ लोकांनी लीगल नोटीस पाठवलीये. या पुस्तकात रेहम खान यांनी नको ते आरोप करत अपमान केल्याचे नोटिशीमध्ये म्हटलेय. नोटीशीत रेहम यांना १४ दिवसांची वेळ देण्यात आलीये. यासोबत या नोटिशीला दिलेल्या वेळेत उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
रेहम माजी अँकर आहे. इम्रान खानसोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या १५ महिन्यांतच त्यांचे लग्न मोडले. आता त्या पुस्तकामुळे पुन्हा चर्चेत आल्यात. याचे कारण म्हणजे या पुस्तकातील काही अंश इंटरनेटवर लीक झालाय. पुस्तकाचे नाव रेहम खान आहे. या पुस्तकात रेहमची विविध सेलिब्रेटींशी बातचीत आणि इम्रान खानसोबतच्या दिवसांबद्दल लिहिण्यात आलेय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुस्तकातील जो अंश ऑनलाईन लीक झालाय. यात रेहमने वसीमवर आरोप केलेत की, वसीमने आपल्या सेक्शुअस फँटॅसीज पूर्ण करण्यासाठी आपली दिवंगत पत्नीला आपल्या समोर दुसऱ्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी सांगितले. पुस्तकातील हा भाग ऑनलान लीक होताच वसीम अक्रमने रेहम खानला नोटीस पाठवलीये. रेहम खान यांनी लिहिलेला पुस्तकातील मजकूर हा बदनामी करणारा आहे. वसीम अक्रम प्रसिद्ध माजी क्रिकेटर आहेत.