१०० किमी स्पीड असलेल्या गाडीत चोरी (व्हिडिओ)

चालत्या गाडीवर स्टंट करणारे अनेक सीन आपण बॉलिवूड - हॉलीवूडमध्ये पाहिले आहे. मात्र हल्लीच एका चालत्या व्हॅनमध्ये चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 17, 2017, 08:34 PM IST
१०० किमी स्पीड असलेल्या गाडीत चोरी (व्हिडिओ)  title=

नवी दिल्ली : चालत्या गाडीवर स्टंट करणारे अनेक सीन आपण बॉलिवूड - हॉलीवूडमध्ये पाहिले आहे. मात्र हल्लीच एका चालत्या व्हॅनमध्ये चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

हा सगळा प्रकार रोमानियाचा आहे जिथे चोरांची एक टोळी अगदी फिल्मी पद्धतीने चोरी करताना दिसत आहे. आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आणि आता तो प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यावर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ २ ते ३ वेळी प्ले कराल. पण ही सत्य घटना आहे. जी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

या व्हिडिओत रोमानियातील पाच चोरांच्या एका गँगने अगदी फिल्मी स्टाईलने चोरी केली आहे. या गँगने चालत्या व्हॅनमधून चक्क ६ मिलियन डॉलरचे आयफोन चोरी केले आहे. ही घटना जूनी असली तरीही त्याचा व्हिडिओ आता समोर आला असून तो व्हायरल होत आहे. आणि या गँगने चोरी करण्यासाठी हायटेक कारचा वापर केला आहे. 

व्हिडिओत तुम्ही पाहाल जवळपास १०० किमी प्रति  वेगाने ही व्हॅन चालत आहे. त्यामागे चोर आपली कार घेऊन जातात. आणि या हायटेक कारमधून एक चोर बाहेर येतो. आणि व्हॅनमधून आयफोन चोरतो आणि पुन्हा एकदा आपल्या कारमध्ये परत जातो. चोर हा संपूर्ण प्रकार इतक्या सहजपणे करतो की, हा व्हिडिओ सुरूवातील खरा वाटत नाही. मात्र ही सत्य घटना आहे.