Royal Wedding : शाही सोहळ्यात मोडली गेली 'ही' जुनी परंपरा

आज लंडनमध्ये प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. 

Updated: May 19, 2018, 08:39 PM IST
Royal Wedding :  शाही सोहळ्यात मोडली गेली 'ही' जुनी परंपरा  title=

 मुंबई : आज लंडनमध्ये प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. विंडसर कॅसलच्या सेंट जॉर्ज चॅपल चर्चमध्ये प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल विवाहबंधनात अडकले. काही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यात पहिल्यांदा एक रिवाज मोडण्यात आला.   

 सासरे झाले वडील 

 प्रिंस हॅरी आज मेगन मार्कलसोबत विवाहबंधनात अडकला. या राजेशाही लग्नाला नेगन मार्कलच्या वडिलांची मात्र अनुपस्थिती होती. त्यामुळे नववधू मेगन मार्कलला विवाहस्थळी घेऊन येण्याची जबाबदारी प्रिंस हॅरीचे वडील प्रिन्स चार्ल्स यांनी सांभाळली. रीतीनुसार वडील नववधूला तिच्या होणार्‍या नवर्‍याकडे घेऊन जातात. प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कलसाठी मुंबईचे डब्बेवाले पाठवणार 'हे' खास गिफ्ट

 

का होती मेगनच्या वडीलांची अनुपस्थिती?   

 मेगन मार्कलच्या वडीलांना हृद्यविकाराचा त्रास जाणवत असल्याने ते या शाही सोहळ्यापासून दूर राहिले आहे. अधिकृत ट्विटर हॅन्डलद्वारा मेगनचे वडील या शाही सोहळ्याला अनुपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रिन्स चार्ल्स यांनी मेगनचा हात प्रिंस हॅरीच्या हातात दिला. 'असा' तयार झाला रॉयल वेडिंंगचा केक !
 
 लग्नानंतर प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल ही जोडी अधिकृतरित्या  duke and duchess of sussex झाले आहेत. प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नात प्रियांंका चोप्राची अशी झाली एन्ट्री