मोठी बातमी । युक्रेनने रशियातील दूतावास केला बंद, इमारतीला सील

Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सात दिवस झाले तरी थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. (Russia Ukraine War) त्यातच आता युक्रेनने रशियातील दूतावास बंद केला आहे.  

Updated: Mar 2, 2022, 05:03 PM IST
मोठी बातमी । युक्रेनने रशियातील दूतावास केला बंद, इमारतीला सील  title=

मास्को : Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सात दिवस झाले तरी थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. (Russia Ukraine War) त्यातच आता युक्रेनने रशियातील दूतावास बंद केला आहे. तिथला सर्व कर्मचारी वर्ग मायदेशी परतला आहे. त्यामुळे इमारतीला सील ठोकण्यात आले आहे. (Russia Ukraine Crisis : Ukraine-Russia political relations terminated?) तसेच इमारतीवरील युक्रेनचा झेंडा देखील उतरवण्यात आला आहे. 

दरम्यान, युक्रेनच्या अनेक शहरांमधला युद्धसंहार धडकी भरवणारा आहे. रशियाने हल्ले करताना रहिवासी परिसरही सोडलेला नाही. युक्रेनमधील झेटोमर शहरातही वेगळी परिस्थिती नाही. हल्ल्यामुळे कोसळलेली घरं, उद्ध्वस्त गल्ल्या, जागोजागी दिसताहेत. रशियानं मिसाईल डागल्यानंतर या शहराची पुरती दैना झाली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

रशियाने युक्रेनच्या मुख्य शहरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पण युक्रेनही तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करत आहे. 7 दिवसात तब्बल 6 हजार रशियन सैन्याला ठार केल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. 

ब्रिटन मंत्रालयानंही याला दुजोरा दिला आहे. युक्रेनच्या दाव्यानुसार आतापर्यंत रशियाची 30 विमाने, 31 हेलिकॉप्टर, 211 रणगाडे युक्रेन सैनिकांनी उध्वस्त केले आहेत. तसेच 862 चिलखती गाड्या, 85 आर्टिलरी सिस्टम्स, 60 इंधन टँक, 355 लष्करी वाहने युक्रेनने उध्वस्त केली आहेत. यासह रशियाची 40 MLRS रॉकेट लाँचर्स युक्रेनने ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.