नवी दिल्ली : रशिया - युक्रेन युद्ध सुरु असताना रशियाचे परराष्ट्रमंत्री आज पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरॉव्ह काल संध्याकाळी भारतात आले आहेत. आज सकाळी ते मोदी यांची भेट घेणार आहेत. (Russian Foreign Minister Sergey Lavrov is expected to meet Prime Minister Narendra Modi)
रशियानं भारताला सवलतीच्या दरात कच्च्या तेल देण्याची ऑफर दिली आहे. लावरॉव्ह यांच्या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्या या तेलखरेदी करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात भारताला रशियानं बॅरलमागे 35 डॉलरची सवलत देण्याची ऑफर दिली आहे.
शिवाय भारत आणि रशिया यांच्यात रुपया-रुबेल या दोन्ही देशांच्या चलनातच व्यवहार करण्याविषयीही चर्चा होणार आहे. रशियाने दिलेली कच्च्या तेलाच्या स्वस्त निर्यातीची ऑफर जर भारताने स्विकारली तर अमेरिका काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
जगभरातून रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यातआले आहे. अशा वेळी भारताने रशियाकडून तेल खरेदी केलं तर रशियला मदतच होणार आहे. याआधी इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणकडून कच्चं तेल आयात करण्याचा निर्णय घेऊन इराणला आर्थिक संकटात मदत केली होती. आता तशीच काहीशी परिस्थिती रशियाची झाली आहे.