पाकिस्तानच्या महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; ट्विट करून म्हटलं...

पाकिस्तानच्या महिला आमदाराचा कथित अश्लिल व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. 

Updated: May 27, 2022, 11:01 AM IST
पाकिस्तानच्या महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; ट्विट करून म्हटलं... title=

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आमदार सानिया आशिक यांचा कथित अश्लिल व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. परंतू त्यानंतर सानिया आशिक यांनी दावा केला होता की, व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी तिच्यासारखी दिसते पण प्रत्यक्षात ती तशी नाही. मात्र तो व्हिडिओ त्यांच्याच नावाने सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. त्यांनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

पाकिस्तानच्या महिला आमदार सानिया आशिक यांच्या कथित अश्लील व्हिडीओचे प्रकरण समोर आले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही आजही व्हायरल होत असतो.

मात्र, सानिया आशिकने याआधीच दावा केला आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी तिच्यासारखी दिसत असली तरी प्रत्यक्षात ती नाही.
सानिया यांच्या तक्रारीनंतर आता पाकिस्तान पोलिसांनी व्हिडीओ लीक प्रकरणात एका आरोपीला अटक केली.