Live Alligator in Luggage: सोनं, मौल्यवान वस्तू तस्करीचे धक्कादायक प्रकार जगभरात घडतात. विमानतळावर बेकायदेशीर वस्तूंची तस्करी पकडण्यासाठी स्कॅनर लावले जातात. स्कॅनरमुळे बेकायदेशीर वस्तू पकडणं सोपं होतं. असंच एक प्रकरण जर्मनीतील म्युनिक विमानतळावर घडलं आहे. पण सूटकेसमध्ये मौल्यवान वस्तू नसून जिवंत मगर होती. सदर व्यक्तीला मगरीची तस्करी करताना रंगेहाथ पकडलं. तो सुटकेसमधून मगर गुपचूपपणे घेऊन जात होता. पण स्कॅनरमध्ये सूटकेस टाकताच चोरी पकडली गेली. पांढऱ्या मगरीच्या तस्करीतून 50 ते 60 लाख रुपये मिळतात. ही मगर सुटकेसमध्ये किती दिवस होती, हे कळू शकलेलं नाही. आरोपीने मगरीला वरून टेप लावली होती. असं असूनही स्कॅनर मशिनमध्ये पकडली गेली.
सुटकेसमध्ये मगर पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले. कारण ती मगर जिवंत होती. घटनेनंतर अधिकार्यांनी तात्काळ रेस्क्यू टीमला पाचारण केले आणि मगरीला सुटकेसमधून बाहेर काढलं आणि संबंधित विभागाच्या ताब्यात दिले. आरोपी हा अमेरिकेचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
Elon Musk यांच्या फिटनेसचं खरं कारण Wegovy! काय आणि कसं काम करतं जाणून घ्या
सदर व्यक्ती जर्मनीहून सिंगापूरला जात होती, असं सांगण्यात येत आहे. मगरीची लांबी 1 मीटर इतकी आहे असून सूटकेसमध्ये दुमडून ठेवली होती. ही मगर आरोपी तस्करीच्या उद्देशाने घेऊन जात होता.