आता पार्टनरला इमोजी पाठवणं पडणार महागात

 WhatsApp असेल इन्स्टाग्राम असेल अशा अनेक ठिकाणी आपण इमोजीसचा वापर करत असतो.

Updated: Feb 17, 2022, 08:56 AM IST
आता पार्टनरला इमोजी पाठवणं पडणार महागात title=

सौदी अरेबिया : भावनांना शब्दात मांडण्याऐवजी आपण एमोजीचा वापर करतो. WhatsApp असेल इन्स्टाग्राम असेल अशा अनेक ठिकाणी आपण इमोजीसचा वापर करत असतो. नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी रेड हार्ट इमोजीचा वापर केला असेल. तुम्हीही जर Red Heart Emojiचा वापर करत असाल तर सावधान व्हा. 

पाशिमात्य देशांपैकी सौदी अरेबीयामध्ये रेड हार्ट इमोजी पाठवणं बरंच महागात पडतंय. या ठिकाणी सायबर कायदे फार कडक आहेत. याठिकाणी जर तुम्ही तुमच्या पार्टनरला रेड हार्ट इमोजी पाठवत असाल तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. इतंकच नाही तर या आरोपांमुळे तुम्हाला 20 लाख रूपयांचं दंडही लागू शकतो. 

काही परिस्थितींमध्ये, 2 वर्षांचा कारावास आणि 20 लाखांचा दंड अशा दोन्ही शिक्षा तुम्हाला भोगाव्या लागू शकतात. मात्र असं तेव्हाचं होईल ज्यावेळी समोरची व्यक्ती मेसेजनंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करेल.

साऊदीचे सायबर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, साऊदीतील कायद्यानुसार, जर रेड हार्ड इमोजी पाठवणारा व्यक्ती दोषी आढळत असेल तर त्याला 2 ते 5 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे त्याला आर्थिक दंडही ठोठावला जाऊ शकतो.

साऊदी अरेबियामध्ये रेड हार्ट इमोजी पाठवणं हे छळाच्या कायद्याअंतर्गत ठेवण्यात आलं आहे. सौदी अरेबियातील एंटी-फ्रॉड एसोसिएशनचे सदस्य अल मोआताज कुतबी यांच्या म्हणण्याप्रमाणे, WhatsApp वर रेड हार्ट इमोजी पाठवणं एक गुन्हा आहे.