Viral Video : मगरीने भरलेल्या तलावात लहान मुलाने मारली उडी, पुढे जे घडलं ते...

मगरीचं नाव ऐकलं तरी अंगाचा थरकाप उडतो, पण या मुलाने चक्क मगरीने भरलेल्या तलावातच उडी मारली, सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय Video

Updated: Dec 29, 2022, 04:04 PM IST
Viral Video : मगरीने भरलेल्या तलावात लहान मुलाने मारली उडी, पुढे जे घडलं ते... title=

Viral Video: आपल्या जवळपास जरी मगर (Crocodile) दिसली तरी अंगाचा थरकाप उडतो. मगरीच्या जबड्यात सापडलेल्या भक्षाची सहजासहजी सुटका होत नाही. आपल्या तीक्ष्ण दातांनी मगर क्षणात भक्षाचा फडशा पाडते. पण एका लहान मुलाने चक्क मगरीने भरलेल्या तलावात (Lake) उडी मारली. डोळ्यावर विश्वास न बसणारा हा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
एका छोट्या तलावात लहान आकाराच्या अनेक मगरी आहेत. इतक्या साऱ्या मगर बघून त्या तलावात पोहण्याचा काय त्या तलावाजवळ जाण्याचाही कोणी विचार करणार नाही. पण आपण व्हिडिओत बघू शकतो एक 8 ते 10 वर्षांचा मुलगा शर्ट काढून तलावाजवळ येतो. त्यानंतर मगरीने भरलेल्या त्या तलावात तो उडी मारतो. व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडतो, इतक्या साऱ्या मगरी लहान मुलाचे लचके तोडेल असंच व्हिडिओ पाहून वाटतं. 

लहान मुलाचं पुढे काय झालं
पण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यास सर्वांचा अंदाज साफ चुकीचा ठरतो. अगदी सहजरित्या तो लहान मुलगा तलावात पोहताना दिसत आहे. त्या मुलाला मगरींची अजिबात भीती वाटत नाहीए. विशेष म्हणजे त्या मगरींपासूनही त्याला कोणताच धोका नसल्याचं दिसतंय. अगदी त्याच्या अंगा खांद्यावर त्या खेळताना दिसतायत. काही मगरी तर त्याच्या पाठिवर बसल्याचं व्हिडिओत पाहिला मिळतंय. @criancafazendoM नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.