Volcano Eruption tourists Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे अनेक नवनवीन गोष्टी पहायला मिळतात. जिथं लोकं पोहचू शकत नाही, त्याठिकाणची दृष्य बसल्या बसल्या पहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Tourists Trending Video) झाला आहे. एका ज्वालमुखीचा हा व्हिडीओ असून त्याला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमलेली दिसत आहे.
जगात अनेक ज्वालामुखी आहेत.मात्र, त्यातील काहीच व्हिडीओ अॅक्टिव आहेत. ज्वालामुखी जागृत झाल्यास भयंकर विध्वंस होऊ शकतो. अशा परिस्थितीत, कोणत्याही सक्रिय ज्वालामुखीजवळ (Active Volcano) जाणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालणं. असंच काहीसे या व्हिडिओतमधून पाहायला मिळतंय.
आणखी वाचा- बापरे! थोडक्यात वाचली..तरुणीसोबत स्विमिंग पूलमध्ये घडलं असं काही..व्हिडीओ पाहून हाल हैराण
आइसलँडमधील (Iceland) हा व्हिडीओ असल्याचं पहायला मिळतं. रेकजेनेस प्रायद्वीपमधील हा अॅक्टिव लावा (Volcano Eruption) असल्याचं दिसतंय. हा ज्वालामुखी पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी दिसत आहे. हे सर्व ट्रेकर्स असल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून कळतंय. हा जिवंत ज्वालामुखी पाहून कोणालाही धक्का बसू शकतो.
When tourists came to watch the lava at Reykjanes peninsula in Iceland pic.twitter.com/J5afF1qqQG
— Science girl (@gunsnrosesgirl3) November 5, 2022
दरम्यान, ज्वालामुखीला स्लीपिंग मॉन्स्टर (Sleeping Monster) असंही म्हणतात. काही वेळाने ज्वालामुखीतून लावा बाहेर पडण्याची प्रक्रिया तीव्र होते, त्यामुळे लोकं काहेसे घाबरलेले दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. अनेकांनी व्हिडीओ शेअर करत लोकांचं कौतूक देखील केलंय.