कौन है ये लोग...! हेअरस्टाईल पाहून तुम्हीही पोट धरून हसाल, पाहा Video

अशी हेअरस्टाइल कशी असू शकते? असा प्रश्न देखील तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत (Viral Video) सलूनमध्ये व्यक्तीने केलेली हेअरस्टाइल (Hairstyle) खूपच विचित्र आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तसंच म्हणाल. 

Updated: Nov 7, 2022, 06:59 PM IST
कौन है ये लोग...! हेअरस्टाईल पाहून तुम्हीही पोट धरून हसाल, पाहा Video title=

Trending News Of Hair Style: डोक्यावरील केस मानवी सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे आपल्या आवडीनुसार वेगवेगळी हेअरस्टाईल करता येते. पण ज्या लोकांच्या डोक्यावर केस नसतात त्यांना याचं सर्वात जास्त दु:ख होतं. अनेकदा टक्कल पडत असल्याने न्यूनगंड येतो. त्यामुळे डोक्यावरील केस किती महत्त्वाचे याची प्रचिती येते. पण सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येईल. अशी हेअरस्टाइल कशी असू शकते? असा प्रश्न देखील तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत (Viral Video) सलूनमध्ये व्यक्तीने केलेली हेअरस्टाइल (Hairstyle) खूपच विचित्र आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तसंच म्हणाल. 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलूनमध्ये न्हावी ट्रिमरने केस काढत आहेत. एकदम झिरो कट मारतो आणि पुढे मागे केसांचा झुपका ठेवतो. त्यानंतर दोन्ही झुपके एकमेकांना जोडतो. त्यानंतर मधोमध मोती लावतो. हा व्हिडीओ अर्थटेल नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ही हेअरस्टाईल कोण ट्राय करेल अशी पोस्ट देखील लिहिली आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून व्हिडीओखाली मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Viral Video: वाढत्या क्राईमबाबत लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना पोपटानं केली चोरी, घटना कॅमेऱ्यात चित्रित

एका युजर्सने लिहिलं आहे की, "कौन है ये लोग कहां से आते है." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "अशी हेअरस्टाईल केली तर आई परत सलूनमध्ये नेईल आणि सांगेल अजून बारीक करा."