'या' सहा वर्षाच्या मुलाची कमाई एेकून चकीत व्हाल!

वय वर्ष सहा म्हणजे खेळायचे-बागडायचे वय. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 12, 2017, 08:44 AM IST
'या' सहा वर्षाच्या मुलाची कमाई एेकून चकीत व्हाल! title=

नवी दिल्ली : वय वर्ष सहा म्हणजे खेळायचे-बागडायचे वय. मात्र याच वयात एक मुलगा कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकतो. ऐकून थोडे आश्चर्य वाटले असले पण हे अगदी खरे आहे. त्याचा एक व्यवसाय आहे. काय करतो हा मुलगा नेमके ? या जाणून घेऊया. 

 टॉप 10 लोकांची यादी जाहीर

काही दिवसांपुर्वी फोर्ब्सने यू-ट्यूबच्या माध्यमातून कमवणाऱ्यांची टॉप 10 लोकांची यादी जाहीर केली. यात 16.5 मिलियन डॉलर कमावणारे डेनियल मिडलटन (Daniel Middleton) हे अग्रस्थानी आहे. प्रामुख्याने गेमिंगवर फोकस करणाऱ्या या 26 वर्षीय युवकाची कमाई चकीत करणारी आहे. मात्र त्याहूनही हैराण करणारी गोष्ट म्हणजे 6 वर्षांच्या रायनची आहे. या यादीत तो 9 व्या स्थानावर आहे. 

आश्चर्यकारक असले तरी अगदी खरे

या मुलाने यू-ट्यूबच्या माध्यमातून वर्षभरात 11 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 71 कोटी रूपये कमावले आहेत. यानुसार हा मुलगा एका महिन्यात सुमारे 6 कोटी रुपये कमावतो. हे अत्यंत आश्चर्यकारक असले तरी अगदी खरे आहे. 

काय करतो हा मुलगा ?

या मुलाचे नाव रायन टॉयज रिव्यू असे असून त्याचे यू-ट्यूब चॅनल अत्यंत लोकप्रिय आहे. करो़डो लोक त्याचे चॅनल पाहतात. रायन आणि त्याच्या कुटुंबियांकडून चालवल्या जाणाऱ्या या चॅनलमध्ये खेळण्यांचा रिव्यू केला जातो. जुलै 2015 मध्ये म्हणजे रायन 4 वर्षांच्या असताना हे चॅनल सुरू केले. आतापर्यंत खूप व्हिडिओज चॅनलवर अपलोड केले आहेत. 

चॅनलबद्दल...

'जायंट एग सरप्राईज' या चॅनलला 80 कोटींहून अधिक व्यूज आले आहेत. त्याचबरोबर 10 मिलियन म्हणजे 1 कोटींहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. 
खेळण्यांबरोबरच लहान मुलांच्या फूड आयटमचे देखील येथे रिव्यू केले जातात. 

किती आहे कमाई ?

 

रिपोर्टनुसार, प्रत्येक महिन्यात रायन एका जाहीरातीतून एक मिलियन डॉलर कमावतो. त्यावर टॅक्स भरून त्याची कमाई एकूण 14.5  बिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे सुमारे 93 कोटी रूपये आहे.