Viral News Today: अमेरिकेत एक विमान प्रवासादरम्यान भीषण दुर्घटना होता होता टळली आहे. डेनवरहून ह्यूस्टनला जाणाऱ्या साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानाचे इंजिन कव्हर विमान हवेत असतानाच तुटले. रविवारी ही दुर्घटना घडली आहे. बोइंग 737-800 चे इंजिन कव्हर तुटून हवेतच कोसळले. या वेळी विमानातील प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. या घटनेनंतर विमान पुन्हा डेनवर येथे परतले. घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. युएस फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन (एफएए)ने बोइंग 737-800 चे इंजन कव्हर कोसळल्याची आणि विंग फ्लॅपला धडकल्याच्या घटनेची चौकशी सुरु केली आहे.
साउथवेस्ट फ्लाइट 3695 रविवारी सकाळी 8.15 मिनिटांच्या सुमारास डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या परतले आहे. 135 प्रवाशांसह पायलटसह सहा क्रु मेंमर्बसना घेऊन जाणारे हे विमान डेनवरहून ह्यूसटसह विमानतळावर रवाना झाले होते. बोइंग विमानाने भरारी घेतल्यानंतर जवळपास 10,300 फुट उंचावर असताना इंजिन कव्हर तुटल्यामुळं पुन्हा माघारी फिरले. त्यानंतर जवळपास 25 मिनिटांपर्यंत पुन्हा विनातळावर उतरले.
विमानातून सुरक्षितरित्या प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर दुसऱ्या विमानातून त्यांना ह्यूस्टन येथे पोहोचवण्यात आले. यात जवळपास प्रवाशांची 4 तास खर्ची झाले. साउथवेस्ट एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, देखरेख करणाऱ्या पथकाने विमानाची चाचपणी केली आहे. तर, एअरलाइनने दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, प्रवाशांच्या गैरसोयीसाठी आम्ही दिलगिरी आहोत. असुविधेमुळं आम्ही प्रवाशांची माफी मागतो. आपले ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. मात्र, विमानाच्या इंजिनाचा शेवटी मेंटेनन्स कधी केला होता. हे सांगण्यास मात्र नकार दिला आहे.तर, एफएएने या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. एफएएच्या रिकॉर्डनुसार, विमानाने जून 2015मध्ये सेवेत प्रवेश केला होता.
Scary moments for passengers on a Southwest flight from Denver to Houston when the engine cover ripped off during flight , forcing the plane to return to Denver Sunday morning. pic.twitter.com/BBpCBXpTsl
— Sam Sweeney (@SweeneyABC) April 7, 2024
अलीकडच्या काळात बोइंग विमानांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. या वर्षी 5 जानेवारी रोजी, अलास्का एअरलाइन्सच्या 737 MAX 9 जेटचे दरवाजाचे प्लग पॅनल 16,000 फूट उंचीवर तुटले. या घटनेनंतर, FAA ने MAX 9 ला अनेक आठवडे उड्डाण करण्यापासून देखील थांबवले. यूएस नियामक अलीकडील इतर अनेक दक्षिणपश्चिम बोईंग इंजिन समस्यांची चौकशी करत आहे. एफएए 25 मार्चच्या साउथवेस्ट 737 फ्लाइटची देखील चौकशी करत आहे जे टेक्सासमधील ऑस्टिन विमानतळावर परत आले होते जेव्हा चालक दलाने संभाव्य इंजिन समस्येची तक्रार केली होती.