Space Science: एका दिवसात किती तास असतात? असं विचारल तर 24 तास हे उत्तर अगदी सहजपण कोणीही देऊ शकेल. पण एका दिवसात 25 तास असतील असं कोणी सांगितलं तर? थोड आश्चर्य वाटलं ना. पण वैज्ञानिकांनी असा दावा केलाय. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती असलेला संपूर्ण एक दिवस हा 24 तासांचा असतो. पण दिवसाचे 25 तासदेखील असू शकण्याची दाट शक्यत वर्तवण्यात आली आहे. पृथ्वीच्या फिरण्याचा कल यामागे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकने (टीयूएम) दिवसात 25 तासाचा दावा केला आहे. भविष्यात दिवसातील तासांची संख्या वाढू शकते, असे वैज्ञानिक सांगत आहेत. हे कधी होणार, याबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे.
जगभरातील विविध देशांमध्ये खगोलशास्त्राबद्दल सखोल संशोधन केले जाते. तेथील लहान-मोठ्या बदलांचा प्रभाव पृथ्वीवर दिसत असतो. त्यामुळे खगोलशास्त्राविषयी माणसाला नेहमीच उत्सुकता असते.म्युनिकचे तांत्रिक विद्यापीठ खगोलशास्त्राच्या क्षेत्रात संशोधन करत आहे. ही संस्था पृथ्वीविषयी माहिती मिळवण्यासाठी विशेष प्रकारची उपकरणे वापरत आहे. याला रिंग लेसर म्हणतात. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा नमुना आणि वेग मोजणे हे त्याचे काम आहे. हे इतके अचूकपणे कार्य करते की ते पृथ्वीच्या हालचालीतील लहान-मोठे बदल देखील सहज ओळखते.
पृथ्वीच्या परिभ्रमणातील चढउतार हे खगोलशास्त्रासाठी खूप महत्वाचे आहेत. यातून अनेक रंजक माहिती समोर येत असते. आता या बदलामुळे एका दिवसात तास वाढल्याची बाब समोर आल्याची माहिती टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकनेच्या या संशोधनाशी संबंधित प्रकल्प प्रमुख अल्रिच शेरिबर यांनी दिली. घन आणि द्रव यासारख्या गोष्टी पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम करतात. हे बदल शास्त्रज्ञांना नवीन माहिती देतात आणि एल निनो सारख्या हवामानाशी संबंधित बदलांचे परिणाम समजून घेण्यास मदत करतात, असे शास्त्रज्ञ सांगतात.
खगोलशास्त्रात हजारो वर्षे अनेक गोष्टी घडत आहेत. पण दिवसाचे 25 तास असं याआधी कधी ऐकलं नव्हत. मग तास नक्की कसे वाढतील असा प्रश्न विचारला जातोय. यावर संशोधकांनी उत्तर दिले आहे. पृथ्वीच्या फिरण्याचा एक ट्रेंड समोर आला आहे त्यावरून ते तासांमध्ये वाढ झाल्याचे दर्शवत असल्याचे संशोधक सांगतात. पृथ्वीचे परिभ्रमण सरकत असून नवीन संशोधनात याला दुजोरा देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. लेझर रिंग एक जायरोस्कोप असून पृथ्वीच्या 20 फूट खाली एका विशेष दाबाच्या भागात आहे. येथून निघणारा लेझर पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगात झालेला बदल लगेच ओळखतो. इथून शास्त्रज्ञांनी तास वाढवण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पृथ्वीशी संबंधित असा डेटा काढणे सोपे नव्हते. शास्त्रज्ञांनी यासाठी लेसरचे मॉडेल विकसित केले, यामुळे पृथ्वीच्या हालचालींचा कल कळू शकेल. त्याच्या मदतीने अचूक रोटेशन माहिती मिळू शकते, असे वैज्ञानिक सांगतात. आजचा दिवस 24 तासांचा आहे, पण असे नेहमीच नव्हते. डायनासोरच्या काळात एका दिवसात 23 तास होते, असे सांगण्यात येते. त्या काळात चंद्र पृथ्वीच्या थोडा जवळ असायचा, असे एका अहवालात म्हटले आहे.
अशी शक्यता वर्तवण्यात येत असली तरी हे सर्व काही एकाच दिवसात अचानक होईल असे नाही. सुमारे 200 दशलक्ष वर्षांनंतर, एक दिवस 25 तासांचा असेल, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत.