Sri Lankan economic crisis : पेट्रोल पंपावर लोकांच्या लांबच लांब रांगा, जवानांना केले तैनात

इंधनाची कमी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामन्यांना फटका बसला आहे.

Updated: Mar 22, 2022, 07:28 PM IST
Sri Lankan economic crisis : पेट्रोल पंपावर लोकांच्या लांबच लांब रांगा, जवानांना केले तैनात title=

कोलंबो : श्रीलंकेत इंधन संकट वाढलं आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल पंपावर वाढती गर्दी पाहता या ठिकाणी सैन्याच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. मंगळवारी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. (long queues outside petrol pumps in sri lanka)

इंधनाची कमी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने हजारो लोकं पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी पोहोचले. वाढती गर्दी नियंत्रण करण्यासाठी जवांनाना पाचारण करण्यात आले.

ऊर्जा मंत्री गामिनी लोकुगे यांनी म्हटलं की, आम्ही पेट्रोल पंपावर जवानांना तैनात करण्याचा निर्णय़ घेतला आहे. ज्यामुळ कोणताही अनुचित घटना घडू नये. लोकं व्यापार करण्यासाठी कॅनमध्ये इंधन भरुन घेऊन जात आहेत.

'ईंधनसाठी होत असलेल्या गर्दीमध्ये 4 लोकांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती पुढे येत आहे. श्रीलंकेत सध्या परिस्थिती बिकट होत चालली आहे. इंधन, गॅस आणि आवश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. श्रीलंका सरकारने भारताकडू मदत मागितली आहे. भारताने श्रीलंकेला एक अरब डॉलरचं कर्ज दिलं आहे.