Trending News In Marathi: अनेकदा दूर देशातील वस्तुही अचानक आपल्याला सापडतात. कधी तरी तुम्ही सुमद्रकिनारी बसलेले असताना अचानक एक मोठी लाट येते आणि या लाटेच्यासोबत एक वस्तुदेखील तुमच्यासमोर येऊन पडते. ही वस्तु पाहून तुम्ही काही काळासाठी हैराण होतात. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली आहे.
समुद्रात गेली कित्येत वर्ष तंरगणारी एक वस्तु महिलेला सापडली. यावर एक संदेशदेखील लिहण्यात आला होता. स्कॉटलँडच्या एका महिलेसोबत ही घटना घडली आहे. स्मिथ नावाची एक महिला समुद्रावर सफाई करत होती. त्याचवेळी तिला एक काचेची बॉटल सापडली. त्याच्या आत काहीतरी रंगीत कागद होता.
स्मिथने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, तिला आधी वाटले की बॉटलच्या आत फेल्ट टिप पेनसारखी एखादी वस्तु आहे. मी जेव्हा ते बाहेर काढले तेव्हा त्याच्या चारही बाजूने इलास्टिक बँड लावला होता. तो एक रोल केलेला कागद होता. मी जेव्हा ते खोलून बघितले तेव्हा हाताने तयार केलेला एखादा नकाशा वाटत होता. ज्याने कोणी हा नकाशा बनावला होता त्याने खूप हुशारीने बाहेरच्या रॅपिंगसाठी वॅक्स क्रेयॉनचा वापर केला होता. याच्या मदतीनेच बॉटलमध्ये पाणी शिरल्यानंतरही नकाशा सुरक्षीत होता.
तिने पुढे म्हटलं आहे की, हा नकाशा 8 वर्षांच्या तीन मुलींना बनावला होता. त्या 1984मध्ये वर्मिट प्रायमरी शाळेत शिकत होत्या. पायरेट थीमवर बनवलेल्या नकाशावर मुलींनी गणिताच्या शिक्षकांविषयी तक्रार मांडली होती. यातील एका नोटमध्ये लिहलं होतं की, कृपया माझी मदत करा. मी वार्मिट प्रायमरी शाळेत शिकत असून मला मिस आय.एल्डरने बंदी बनवले आहे. माझे नाव मैकक्लम असून वय 8 वर्षे इतके आहे. मिस एल. एल्डर आमच्याकडून खूप काम करवून घेते. मी हे पत्र खासगीपद्धतीने लिहित आहे. कृपया माझी मदत करा.
स्मिथने बॉटल मिळाल्यानंतर या मुलींशी संपर्क करण्याचा प्रय़त्न केली. त्यानंतर त्यांनी केली मॅक्कलम आणि इतर दोन मुली लिंडा बेला आणि अन्ना ग्रीनहाल्घसोबत संपर्क केला. वयाने मोठ्या झालेल्या मुलींनी जेव्हा हा मेसेज पाहिला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांना जेव्हा याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, हा मेसेज शाळेतील अभ्यासक्रमाचा एक भाग होता. जेव्हा त्यांना समुद्री दरोडेखोरांबद्दल शिकवले जात होते. बेलने एसटीव्हीला सांगितले की, 40 वर्ष झाले तरी कोणालाही हा मेसेज मिळाला नाही. या तिन महिलांनी म्हटलं आहे की पत्र लिहल्यापासून ते आजपर्यंत त्या मैत्रिणी आहेत.