Suicide Forest Of Japan: जगात अनेक रहस्यमय गोष्टी अस्तित्वात आहेत. जगातील काही घटनांचे व अस्तित्वात असलेल्या रहस्यांचे गूढ अद्यापही सोडवण्यात यश आलेले नाही. जगभरातील अनेक रहस्यमयी गोष्टींचे गूढ उकलण्यासाठी संशोधनदेखील करण्यात आले. मात्र, त्याचे उत्तर अद्याप कोणालाही सापडले नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबाबत सांगणार आहोत. या जागेला सुसाइट पॉइंट असंही म्हणतात. हे एक घनदाट जंगल असून याचे नावच सुसाइड फॉरेस्ट असं आहे. जपानमध्ये हे जंगल असून इथे जीपीएस आणि कंपासदेखील सुरू होत नाही.
जपानमध्ये असलेल्या या जंगलाचे नाव ऑकिगहरा असं आहे. मात्र, असं म्हणतात की या जंगलात येताच लोक आत्महत्या करतात. म्हणूनच या जंगलाचे नाव सुसाइट फॉरेस्ट असं ठेवण्यात आले आहे. या जंगलाबाबत काय आख्यायिका आहेत हे आज सविस्तर जाणून घेऊया.
निसर्गाने नटलेल्या आणि हिरव्या गर्द झाडांमुळं हे जंगल सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू आहे. मात्र या जंगलाबाबत अनेक भयानक आख्यायिका सांगितल्या जातात. हे जंगल जगभरात प्रसिद्ध आहे. तर, जगात सगळ्यात लोकप्रिय सुसाइड प्लेसेसमध्ये दुसऱ्या नंबरवर आहेत. जपानची राजधानी असलेल्या टोक्योपासून दोन तासांच्या अंतरावर हे जंगल आहे. या जंगलाचे रहस्य इतकं भयानक आहे की इथे येऊन हजारो लोक आत्महत्या करतात. त्यामुळं जगलाला भुताचे जंगल म्हणूनही ओळखले जाते.
जपानच्या लोकांची अशी मान्यता आहे की, जंगलात भुतांचा वास आहे. जंगलात शिरणाऱ्या लोकांना भूत आत्महत्या करण्यास मजबूर करतात. जेव्हा तुम्ही जंगलात एन्ट्री करता तेव्ह सुरुवातीलाच एका बोर्डवर इशारा देण्यात आला आहे. त्यात म्हटलं आहे की, तुमच्या मुलांबाबत आणि कुटुंबाबात विचार करा. तसंच, हे आयुष्य म्हणजे आपल्या आई-वडिलांनी दिलेली किमती भेटवस्तू आहे.
माउंट फुजीतील नॉर्थवेस्ट येथे हे जंगल आहे. 35 स्केअर किमीपरिसरात पसरलेले आहे. हे जंगल इतके घनदाट आहे की एकदा का तुम्ही जंगलात शिरलात की तिथून बाहेर पडण्याचा मार्ग मिळणे अवघड आहे. अधिकृत अहवालानुसार, या जंगलात 2003नंतर 105हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह सडलेले होते तर काही जंगली प्राण्याचे शिकार ठरले होते.
जंगल घनदाट असल्याकारणानेच लोक रस्ता भटकतात, बाहेर पडायचा रस्ता न सापडल्यामुळं लोक इतके जास्त घाबरतात की ते स्वतःलाच संपवतात. या जंगलात कंपास किंवा मोबईलसारखे उपकरण कधीच काम करत नाहीत. कंपासमधील सुई इथे कधीच बरोबर रस्ता दाखवत नाही. जंगलाच्या परिसरात राहणारे लोकांच्या म्हणण्यानुसार, रात्री-अपरात्री जंगलातून जोरजोरात ओरडण्याचे व किंचाळण्याचे आवाज येतात. तसंच, जंगात साधारणतः 300वर्षांपेक्षा जुनी झाडे आढळतात, असं जाणकार सांगतात.