काळजी घ्या ! कोरोना व्हायरसचा प्रवास २५ ते २७ फुटांपर्यंत

कोरोनाचे विषाणू २५ ते २७ फुटांपर्यंत प्रवास करु शकतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

Updated: Apr 1, 2020, 10:04 AM IST
काळजी घ्या ! कोरोना व्हायरसचा प्रवास  २५ ते २७ फुटांपर्यंत

मुंबई : कोरोनाचे विषाणू २५ ते २७ फुटांपर्यंत प्रवास करु शकतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील सुप्रसिद्ध मँसँच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने यासंदर्भातला धक्कादायक अहवाल सादर केला आहे. मायक्रो ड्रॉपलेट अत्याधुनिक कॅमेऱ्यात कोरोना विषाणूंचा हा प्रवास कैद झाला आहे.

धक्कादायक : डोंबिवलीत  कोरोनासदृश महिलेचा मृत्यू

माणसं शिंकल्यानंतर हजारोंच्या संख्येने अतिसूक्ष्म कण हवेत मिसळतात. त्यापैकी काही इतके हलके असतात की ते  २५ ते २७ फूटांपर्यंत हवेत पसरु शकतात. याचा अर्थ असा की कोरोनाग्रस्त माणूस जर शिंकला तर तर कोरोनाचा विषाणू अतिसूक्ष्म कणांद्वारे त्याच्यापासूनच्या २५ फुटांवरील परिसरातल्या हवेत जिवंत राहून लोकांना त्याची लागण होऊ शकते.

अतिशय धोकादायक वास्तव MIT मधील जपानी शास्त्रज्ञांनीच केला आहे. त्यामुळे सोशल डिस्टंग्सिंग किती महत्वाचे आहे, यावरून स्पष्ट होते. शिवाय शिंकताना नाकातोंडासमोर रुमाल लावा. अन्यथा कोरोनाची लागण इतरांनाही होण्याची शक्यता आहे.