400 फूट खोल दरीत कोसळली कार, iPhone मुळे चालकाला मिळालं जीवनदान

मोबाईल हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आता तर मोबाईने एका व्यक्तीचा चक्क जीवच वाचवला आहे. एका अपघातात कार 400 फूट खोल दरीत कोसळल. पण आयफोन 14 मुळे या व्यक्तीचा जीव वाचला. 

राजीव कासले | Updated: Jul 27, 2023, 06:19 PM IST
400 फूट खोल दरीत कोसळली कार, iPhone मुळे चालकाला मिळालं जीवनदान title=

iPhone Technology : Apple प्रोडक्टमध्ये असलेल्या काही फिचर्समुळे वापरकर्त्याला आरोग्यविषयक सुविधा मिळतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. रोड अपघातात एक कार थेट 400 फूट खोल दरीत कोसळली. इतक्या भीषण अपघातानंतरही त्या व्यक्तीचा जीव वाचला. iPhone 14 मध्ये असलेल्या एका फिचरमुळे अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत मिळाली. हे पहिलंच प्रकरण नाहीए. याआधी Apple Smartwatch मुळेही एका व्यक्तीचा जीव वाचला होता. त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला होता, अॅपल वॉचमुळे या व्यक्तीला वेळेत रुग्णालायत पोहोचवण्यात आलं त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. 

कशी मिळाली मदत?
अमेरिकेतल्या लॉस एंजिल्समध्ये एका व्यक्तीच्या कारचा भीषण अपघात झाला. त्याची कार माऊंट विल्सन डोंगरावरुन 400 फूट खोल दरीत कोसळली. अपघात झाला त्यावेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे कार दरीत कोसळल्याचं कोणालाच माहित नव्हतं. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने चालकाचा जीव वाचला, पण या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. दरीत कोसळल्याने त्याचा आवाजही वरपर्यंत पोहचणं शक्य नव्हतं. अशात त्या व्यक्तीच्या मदतीला आला तो त्याचा iPhone 14. आयफोनमध्ये Crash Detection आणि Emergency SOS हे दोन फिचर्स असून ते थेट सॅटेलाईटशी जोडले गेले आहेत. 

इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्क नसल्यावर हे फिचर काम करायला सुरुवात करतं. या फिचरनेच अपघातग्रस्त व्यक्तिचा जीव वाचला. 

कसं काम करतं हे फिचर?
iPhone 14 मध्ये असलेलं हे फिचर अपघातानंतर स्वत:हून काम सुरु करतं. जेणेकरुन अपघातग्रस्त व्यक्तिला लवकरात लवकर मदत मिळू शकते. Emergency SOS हे फिचर सॅटेलाईटवर काम करतं. या फिचरच्या माधम्यातून आपातकालीन यंत्रणेला तात्काळ मेसेज पाठवले जातात. इतकंच नाही तर घटनास्थळाचं अचूक लोकेशनही दाखवलं जातं. लॉस एंजिल्समध्ये कार अपघातातील व्यक्तीला याच फिचरमुळे तात्काळ मदत मिळाली.

कार दरीत कोसळल्यानंतर त्या व्यक्तीच्या iPhone 14 मध्ये असलेल्या फिचरमुळे डोंगराळभाग असतानाही बचावपथक त्याच्यापर्यंत पोहोचू शकलं. त्यानंतर त्या व्यक्तीला रेस्क्स्यू करुन तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. Crash Detection आणि Emergency SOS हे फिचर्स आयफोन 14 मधल्या iOS 16.1 व्हर्जनबरोबर अपडेट करावं लागतं. याआधी हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचा जीव अॅपल वॉच मुळे वाचला होता. अॅपल वॉचमधल्या Emergency SOS फिचरममुळे त्याला तात्काळ मदत मिळाली होती.