The Burning Tree: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक मोठं झाड आतून जळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही आग आतून कशी लागली असावी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. द रिजविले टाऊनशिप स्वयंसेवक अग्निशामक विभागाने बुधवारी फेसबुकवर जळत्या झाडाची छायाचित्रे शेअर केली आहेत. जी आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना येणाऱ्या अडचणी पाहून आश्चर्य वाटले.
अग्निशमन विभागाने पोस्टमध्ये लिहिले की, 'सकाळी आम्हाला एका झाडाला आग लागल्याची माहिती मिळाली. हे झाड शोधण्यासाठी आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले. जसे आपण खाली पाहू शकता. वीज पडल्याने झाडाला आग लागली आहे. त्यावर नियंत्रण मिळवायला आम्हाला बराच वेळ लागला.' झाडावर वीज पडल्यामुळे आग लागल्याचं स्पष्ट झालं आहे.
झाडाला आग कशी लागली असेल याबद्दल नेटकऱ्यांनी अनेक अंदाज बांधले. एका यूजरने लिहिले की, 'ते सुंदर झाड गमावणे निराशाजनक आहे.' काहींनी गंमतीने लिहिले की, 'हा नरकाचा दरवाजा आहे.' नेटफ्लिक्सच्या 'स्ट्रेंजर्स थिंग' या मालिकेशी जोडून त्याने हे लिहिलं आहे.