मुंबई : M | O | C कॅन्सर केअरने कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळवले आहे. रिलॅप्स्ड रिफॅक्टरी डिफ्यूज लार्ज बी- सेल लिम्फोमा (DLBCL) या रक्ताच्या कॅन्सरच्या प्रकारासाठी CAR-T थेरपी घेतलेल्या पहिल्या रुग्णाला यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. या यशानंतर M | O | C भारतातील CAR-T थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती देणाऱ्या अग्रगण्य कॅन्सर केअर संस्थांमध्ये सामील झाले आहे.
M | O | C कॅन्सर केअर सेंटर द्वारे ठाण्यातील 60 वर्षीय व्यक्तीवर यशस्वी उपचार करण्यात आले. रुग्णाने मागील तीन वर्षांपासून रिलॅप्स्ड आणि रिफॅक्टरी लिम्फोमाशी झुंज दिली होती. यापूर्वी घेतलेल्या इम्युनोथेरपीसह इतर उपचार पद्धती अपयशी ठरल्या होत्या. 5 नोव्हेंबर 2024 रोजी 60 वर्षीय रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, त्यांच्यावर CAR-T थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. उपचारानंतर कोणत्याही गुंतागुंतीशिवाय रुग्णाला 24 नोव्हेंबर 2024 रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
CAR-T (चायमेरिक अँटीजेन रिसेप्टर टी-सेल) थेरपी ही कॅन्सर उपचारातील क्रांतिकारी पद्धत असून या प्रक्रियेत रुग्णाच्या स्वतःच्या टी-सेल्सला अनुवांशिकरीत्या बदलून कॅन्सर पेशींना अचूकपणे लक्ष्य करण्यासाठी तयार केले जाते. या थेरपीद्वारे रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग करून, आक्रमक आणि पूर्वी उपचार न होणाऱ्या रक्ताच्या कॅन्सरवरील उपचारासाठी नवीन आशा निर्माण झाली आहे. हे यश इम्युनो ACT च्या सहकार्याने शक्य झाले असून यामाध्यमातून CAR-T सेल्स तयार करण्यासाठी आपले कौशल्य प्रदान केले.
मिळालेलं यश हे M | O | C च्या अत्याधुनिक उपचार पद्धती आणि जागतिक दर्जाच्या कॅन्सर केअर देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. "CAR-T थेरपी ही रिलॅप्स्ड आणि रिफ्रॅक्टरी लिम्फोमाच्या रुग्णांसाठी विशेषतः महत्त्वाची आहे, ज्यांच्यासाठी पारंपरिक उपचार पद्धती अपयशी ठरतात." असे डॉ सुरज चिरानिया यांनी सांगितले. डॉ. सुरज चिरानिया आणि डॉ. अश्रय कोले, हेमाटो-ऑन्कोलॉजिस्ट आणि BMT तज्ज्ञ म्हणाले की, "ही उपलब्धी ऑन्कोलॉजी केअरच्या नव्या युगाची सुरुवात दर्शवते, जी गुंतागुंतीच्या रक्ताच्या कॅन्सरशी झुंज देणाऱ्या असंख्य रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवीन आशा निर्माण करते".
M | O | C ही पश्चिम भारतातील सामुदायिक कॅन्सर सेंटरची साखळी आहे. अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्टच्या टीमसह, M | O | C कॅन्सर उपचारात नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करून रुग्णांचे आरोग्य सुधारण्याचे काम करते.
रुग्णः 60 वर्षीय पुरुष, ठाणे, मुंबई
आजारः रिलॅप्स्ड रिफॅक्टरी डिफ्यूज लार्ज बी-सेल लिम्फोमा (DLBCL)
उपचार कालावधीः 5 नोव्हेंबर 2024 रोजी दाखल; 24 नोव्हेंबर 2024 रोजी डिस्चार्ज
पार्श्वभूमीः इम्युनोथेरपीसह तीन उपचार पद्धती अपयशी
ही उपलब्धी मुंबईला अत्याधुनिक ऑन्कोलॉजी केअरच्या केंद्रस्थानी आणते. M | O | C खासगी आरोग्यसेवेत नाविन्यपूर्ण कॅन्सर उपचार आणून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवीन आशा निर्माण करत आहे
Disclaimer : (हा लेख इंडियाडॉटकॉम प्रायव्हेट लिमिटेडच्या कंझ्युमर कनेक्ट इनिशिएटिव्हचा एक भाग आहे. हा एक सशुल्क प्रकाशन कार्यक्रम आहे. IDPL कोणत्याही संपादकीय सहभागाचा दावा करत नाही आणि लेखाच्या सामग्रीतील कोणत्याही त्रुटी किंवा चुकांची जबाबदारी घेत नाही.)
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.