Virgin Birth : शिकागो येथील प्रसिद्ध प्राणी संग्रालयात अजब प्रकार घडला आहे. 4 वर्षापासून एकट्या असलेल्या मादी शार्कने पिलांना जन्म दिला आहे. नराच्या संपर्कात न येते मादी शार्कने पिलांना जन्म कसा काय दिला? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तसेच या प्रकारामुळे प्राणी संग्रलयात खळबळ उडाली आहे.
पृथ्वीतलावर सजिवाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी प्रजनन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक सजीवामध्ये प्रजननाची प्रक्रिया होते. नर आणि मादी यांच्यात शारिरीक संबध प्रस्थापित होतात. यातून नवा जीव जन्माला येतो. शिकागो येथील प्रसिद्ध प्राणी संग्रालयात एका मादी शार्कने शारिरीक संबध न ठेवता पिलांना जन्म दिला आहे.
शिकागो, इलिनॉय येथील ब्रूकफील्ड प्राणीसंग्रहालयात हा अजब प्रकार घडला आहे. ही मादी शार्क गेल्या चार वर्षांपासून एकटीच राहत होती. या मादी शार्कसह येथे एकही नर शार्क नव्हता. असं असताना या मादी शार्कने पिलांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे प्राणी संग्रालयात एकच खळबळ उडाली आहे.
शरीर संबध न ठेवता मादी शार्कने पिलांना जन्म दिल्याने हे कसं काय घडल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. या मादी शार्कने पिलांना जन्म दिल्यानंतर अनेक महिने प्राणी संग्रालय प्रशासनाने ही गोष्ट अनेक महिने लपवून ठेवली. प्राणी संग्रालय प्रशासनाने मादी शार्कसह तिच्या पिलांची विशेष काळजी घेतली.
मादी शार्क ने नर शार्कसह कोणतेही संबध न ठेवता पिलांना जन्म दिला आहे. या प्रजनन प्रक्रियेला व्हर्जिन बर्थ असे म्हणतात. पृथ्वीतलावर लाखो जीव अस्तित्वात आहे. यापैकी काही जीव असे आहेत जे शरीरसंबध न ठेवता प्रजनन करतात. शुक्राणूशिवाय मादी गर्भवती होते. वैज्ञानिक भाषेत याला पार्थेनोजेनेसिस म्हणतात. शार्क सारख्या पृष्ठवंशी प्राण्यांसाठी व्हर्जिन जन्म ही एक दुर्मिळ घटना आहे. खूप कमी जीवांमध्ये शरीर संबध न ठेवता जीव निर्माण करण्याची दुर्मिळ क्षमता असते. काही पक्षी, शार्क, सरडे, साप अनेकदा वर्षानुवर्षे एकटे राहतात. यामुळे ते व्हर्जिन बर्थ प्रक्रियेद्वारे नाव जीव निर्माण करतात. स्वत:चा क्लोन तयार करुन हे नवा जीव जन्माला घालतात.