भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना जोरदार सुनावले

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला भारताकडून जोरदार उत्तर दिलं गेलं.

Updated: Jul 30, 2022, 10:03 PM IST
भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना जोरदार सुनावले title=

ताश्कंद : उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद स्पष्टपणे दिसून आले. भारत आशिया आणि युरोपमधील कनेक्टिव्हिटीसाठी चाबहार बंदराचा वापर करण्याचा आग्रह धरत असताना, पाकिस्तानने सीपीईसीचा उल्लेख करून वातावरण तापवले. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केले, तर पाकिस्तानच्या बाजूने नवे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भाग घेतला. भारताने इराणचे चाबहार बंदर विकसित केले आहे, तर CPEC हा चीन आणि पाकिस्तानमधील महत्त्वाकांक्षी कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहे.

बैठकीला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, कोविड महामारी आणि युक्रेन संघर्षामुळे जगाला ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे. ही दोन्ही संकटे तातडीने दूर करावीत, यावर त्यांनी भर दिला. इतकंच नाही तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या उपस्थितीत जयशंकर यांनी दहशतवादावरही खडे बोल सुनावले. त्यांनी सदस्य देशांना सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारण्याचे आवाहन केले. 

पाकिस्तान संपूर्ण जगात दहशतवादाचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. यामुळेच भारताने पाकिस्तानसोबतची द्विपक्षीय चर्चा स्थगित केली आहे.

उझबेकिस्तानच्या अध्यक्षतेखाली ताश्कंद येथे झालेल्या SCO देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत एस जयशंकर यांनी इराणच्या चाबहार बंदराच्या वापरावर भर दिला. त्याच वेळी, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी सीपीईसीचा संदर्भ दिला. दोन्ही नेत्यांनी युरेशियामधील कनेक्टिव्हिटीवर स्वतंत्रपणे आपले मत व्यक्त केले. एस जयशंकर यांच्या अनुभवावर बिलावल भुट्टोच्या अनुभवाची छाया पडली. 

दोन महिन्यांपूर्वीच बिलावल पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झाले. त्यांना राजनैतिक संबंध आणि परराष्ट्र धोरणाचा कोणताही अनुभव नाही. एससीओच्या बैठकीतही त्यांचा अननुभवीपणा स्पष्टपणे दिसून आला.

जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना कोरोना व्हायरस लस, गहू आणि औषधे देऊन भारताच्या पाठिंब्याचा उल्लेख केला. याशिवाय त्यांनी SCO मध्ये इराणच्या प्रवेशाचेही स्वागत केले. SCO सदस्य देश चाबहार बंदर वापरू शकतात यावर त्यांनी भर दिला. बैठकीपूर्वी जयशंकर यांनी कझाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी SCO सरचिटणीस झांग मिंग, त्यांच्या उझबेक आणि किर्गिझ समकक्षांसोबत बैठका घेतल्या. जयशंकर यांनी चीन, रशिया आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसह उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचीही भेट घेतली.