बिकीनी फोटो नसल्याने 70 हजार लोकांनी केले अनफॉलो

फॅशन, टीव्ही, सिनेमा आदींच्या पडद्यावर वावरणाऱ्या लोकांचे वावरणे किती कृत्रीम असते याची आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल. पण, त्यांच्या या कृत्रिम वावरण्याची वास्तव जीवन जगणाऱ्या आपल्यापैकी अनेकांनी इतकी सवय करून घेतलेली असते की, ही मंडळी अशा लोकांना वेगळ्या भूमिकेत पाहूच शकत नाहीत. कॅनडातील एका मॉडेलला नुकताच हा अनुभव आला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 13, 2017, 09:46 PM IST
बिकीनी फोटो नसल्याने 70 हजार लोकांनी केले अनफॉलो title=
छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम

कॅनडा : फॅशन, टीव्ही, सिनेमा आदींच्या पडद्यावर वावरणाऱ्या लोकांचे वावरणे किती कृत्रीम असते याची आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल. पण, त्यांच्या या कृत्रिम वावरण्याची वास्तव जीवन जगणाऱ्या आपल्यापैकी अनेकांनी इतकी सवय करून घेतलेली असते की, ही मंडळी अशा लोकांना वेगळ्या भूमिकेत पाहूच शकत नाहीत. कॅनडातील एका मॉडेलला नुकताच हा अनुभव आला.

हॉट फोटो करायची शेअर

सोफी ग्रे असे या मॉडेलचे नाव आहे. सोफिया @wayofgray नावाचे एक पेज चालवते. या पेजवर ती फिटनेस ट्रेनर म्हणून वावरत असे. या पेजच्या माध्यमातून ती लोकांना आपल्या तंदूरूस्त फिगरचे फोटो शेअर करत असे. त्यासाठी ती आपल्या फिट बॉडीचे (तंदुरूस्त शरीर) हॉट आणि बोल्ड फोटो टाकत असते. कधी कधी आपल्या फॉलोअर्सना अधिक प्रेरीत करण्यासाठी ती आपले बिकीनी फोटोही या पेजवरून शेअर करत असे. मात्र, काही दिवसांपूर्वीच सोफीयाने आपल्या पेजवरून एक पोस्ट शेअर केली.

बिकीनी फोटो केले नाहीत शेअर

सोफीयाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये यापुढे आपण बिकीनी फोटो शेअर करणार नसल्याचे म्हटले होते. तिने हा निर्णय वास्तवातही उतरवला. मात्र, तिच्या या भूमिकेमुळे तिचे फॉलोअर्स भलतेच चिडले. सोफिया आपले बिकीनी फोटो शेअर करत नाही केवळ या कारणास्तव तब्बल 70 हजार लोकांनी तिचे इन्स्टाग्राम पेज अनफॉलो केले.

प्रामाणिकपणे व्यक्त केली भावना

दरम्यान, एकाच वेळी इतक्या लोकांनी पेज अनलाईक करणे हे सोफियासाठी धक्कादायक होते. मात्र, तरीही तिने आपली भावना प्रामाणिकपणे व्यक्त केली असून, ती आपल्या निर्णयावर ठाम आहे. सोफियाने म्हटले आहे की, मला माझ्या या कृत्रिम आणि अशा प्रकारच्या लाईफस्टाईलचा कंटाळा आला आहे. त्यामुळे मला फिट दाखविण्यासाठी मी बिकीनी फोटो शेअर करणार नाही. 

'ती' मी नव्हेच

तिच्या या निर्णायमुळे लोकांनी तिच्यावर लाग व्यक्त केला. पण, त्यालाही ती बदली नाही. उलट तीने सांगितले की, फोटोमध्ये तुम्ही मला पाहात अहात. पण, वास्तवात 'ती' मी नव्हेच. माझ्या फोटोतली ती व्यक्ती भलतीच कुणीतरी आहे. पुढे सोफिया असेही म्हणते की, कोणी काहीही म्हटले तरी, मी माझा निर्णय बदलणार नाही. मी आता थकले आहे. प्रत्येक महिलेला दुसऱ्यांच्या नजरेत तोलने मला योग्य वाटत नाही. मी माझ्या शरीराला वाईट का समजावे? मी मेकअप का करावा? मी जी वास्तवात नाहीच आहे तसे का दाखवावे? आता माझं ठरलंय मला जसे वाटेल तसेच मी राहीन