भारताला बदलण्यासाठी सरकार दिवस-रात्र काम करतंय - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फिलीपीन्स बिझनेस आणि गुंतवणूक समिटमध्ये बोलताना म्हणाले की, भारतात अभूतपूर्व पद्धतीने बदल होत आहेत.

Updated: Nov 13, 2017, 05:20 PM IST
भारताला बदलण्यासाठी सरकार दिवस-रात्र काम करतंय - पंतप्रधान title=

मनीला : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फिलीपीन्स बिझनेस आणि गुंतवणूक समिटमध्ये बोलताना म्हणाले की, भारतात अभूतपूर्व पद्धतीने बदल होत आहेत.

आम्ही देशात पारदर्शी, सहज आणि प्रभावी शासन चालवण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहोत. याआधी आशियान शिखर सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दोन्ही देशातील सुरक्षेसंबंधी चर्चा केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान त्यांच्या सरकारचा मूलमंत्र सांगितला. ‘मिनिमम गर्व्हमेंट, मॅक्सिमम गव्हर्नेंस’ या गोष्टीवर भर देत त्यांनी ३ वर्षातील कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, भारता मोठ्या प्रमाणात लोकांना बॅंकिंगच्या सेवांबद्दल माहिती नव्हतं. काही महिन्यातच जनधन योजनेद्वारे चित्र पूर्णपणे बदललं आणि त्यामुळे लाखो लोकांच्या जीवनात बदल झाला.

ते म्हणाले की, भारतात डिजिटल ट्रान्झॅक्शनची संख्या वाढली आहे. सरकार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक गोष्टींचा वापर करत आहे. आम्हाला भारताला मॅन्यूफॅक्चरिंग हब करायचं आहे आणि देशातील तरूणांना जॉब क्रिएटर. आता भारतातील जास्तीत जास्त सेक्टर परदेशी गुंतवणूकीसाठी खुले झाले आहेत. 

दरम्यान, शनिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, या विशाल देशाल देशासाठी आणि त्यातील लोकांना सोबत घेण्यासाठी ते सफलतापूर्वक काम करत आहेत. तसेच, भारत हा आशिया प्रशांत क्षेत्रातील वेगाने प्रगती करणारा देश आहे.