Coronavirus : असे बचावले ब्रिटनचे पंतप्रधान, त्यांच्या नवजात मुलाशी आहे कोरोनाचं खास कनेक्शन

वृत्तानुसार जॉनसन यांना श्वासोच्छवास घेण्यास काही अडचणी येत होत्या

Updated: May 3, 2020, 11:59 AM IST
Coronavirus : असे बचावले ब्रिटनचे पंतप्रधान, त्यांच्या नवजात मुलाशी आहे कोरोनाचं खास कनेक्शन  title=
संग्रहित छायाचित्र

ब्रिटन : संपूर्ण जगभरात Coronavirus कोरोनाचं सावट असतानाच काही राष्ट्रांच्या प्रमुखांनाही या विषाणूने विळखा घातला. देशाला एक दिशा दाखवणाऱ्या किंवा देशाचं नेतृत्त्व करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला असं काहीतरी होणं हे नागरिकांसाठीही तितकंच आव्हानात्मक असतं. ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. जिथे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. 

कोरोनाचे उपचार घेत जॉनसन यांनी या विषाणूवर मात केली आणि आपल्या उपचाराच्या प्रक्रियेविषयी माहितीही दिली. जॉनसन यांचा कोरोनासोबतचा हा लढा आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील एक घटना सध्या बरीच चर्चेत आहे. 

'सन'च्या वृत्तानुसार जॉनसन यांना श्वासोच्छवास घेण्यास काही अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता. आपण ज्या परिस्थितीमध्ये अडकलो आहोत, त्यातून कसं बाहेर पडायचं हा एकच विचार आपल्या मनात असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या संघर्षाविषयी सांगत असताना या परिस्थितीमध्ये डॉक्टरांच्या प्रयत्नांना महत्त्वाची असते ती म्हणजे इच्छाशक्तीची साथ. याच बळावर हा लढा जिंकण्याचा मार्ग अधिक सुकर होतो, असा सूर त्यांनी आळवला. 

आपली प्रकृती अतिशय खालावली होती, असं सांगत कोरोनामुळे खालावलेल्या प्रकृतीचा डॉक्चरांना अंदाज होता. यासाठी ते संभाव्य परिस्थितीसाठी तयारच होते. त्यामुळे मी डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या परिस्थितीवर मात करु शकलो, असं जॉनसन यांनी न विसरता सांगितलं. 

जॉनसन यांच्या मुलांचं या कोरोनाशी आहे अनोखं नातं. 

एकिकडे जॉनसन कोरोनाशी झुंज देत असतानाच त्यांच्या या संघर्षामध्ये त्यांना साथ मिळाली होती ती काही डॉक्टरांची. ज्यांनी अविरत सेवा करत, कोरोनावर मात करण्यास मोलाचं सहकार्य केलं. याच डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावांवरुन जॉनसन यांच्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं. 

 

बुधवारी जन्मलेल्या या बाळाच्या नावाची अधिकृत माहिती शनिवारी देण्यात आली. कॅरी सायमंड्स यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देत लिहिलं, "Wilfred after Boris' grandfather, Lawrie after my grandfather, Nicholas after Dr Nick Price and Dr Nick Hart - the two doctors that saved Boris' life last month,". त्यांनी दिलेली ही माहिती क्षणार्धातच माध्यमांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि जॉनसन यांच्या मुलांच्या नावाचं कोरोनाशी असणारं हे अनोखं कनेक्शनही चर्चेचा विषय ठरलं.