लोकांना फक्त एक प्रश्न विचारुन या महिलेने वर्षभरात कमावले 8 कोटी

एका महिलेने सोशल मिडियाच्या माध्यमातून 8 कोटींची कमाई केली. फक्त एक प्रश्न विचारुन एका वर्षात तिने हे पैसे कमावले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jan 21, 2024, 11:58 PM IST
लोकांना फक्त एक प्रश्न विचारुन या महिलेने वर्षभरात कमावले 8 कोटी title=

salarytransparentstreet : आयुष्यात सगळेजण पैसा कमवण्यासाठी अथक परिश्रम घेत असतात. अनेकजण श्रमजीवी असतात. तर, काही बुद्धीजीवी असतात. पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र, आपल्या कुवतीप्रमाणे योग्य निवडता आला पाहिजे. एका महिलेने आपल्या हुशारीने एका वर्षात कोट्यावधीची कमाई केली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या महिलेने लोकांना फक्त एक प्रश्न विचारुन वर्षभरात 8 कोटी रुपये कमावले आहेत. ही महिला सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

हॅना विल्यम्स असे या महिलेचे नाव आहे. 27 वर्षीय हॅना ब्रिटनची रहिवासी आहे. डेली मेलने हॅनाच्या कमाईबाबत एक स्पेशल रिपोर्ट बनवला. हन्ना आणि तिचा पती डॅनियल हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. सोशल मिडियावर व्हिडिओच्या माध्यमातून अनेकजण पैसे कमावतात अशी माहिती या दोघांना मिळाली. त्यांनी  देखील सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करुन कमाई करण्याचा निर्णय घेतला. 

आयडिया सुपरहिट ठरली 

सोशल मिडियावर लोक्यांची लक्ष वेधण्यासाठी या जोडप्याने अतिशय हटके आयडिया शोधून काढली आणि त्यांची ही आयडिया सुपरहिट ठरली.  हन्ना आणि तिच्या पतीचे इन्स्टाग्रामवर @salarytransparentstreet नावाने अकाऊंट आहे. या अकाऊंटवरुन हे दोघे व्हिडिओ शेअर करतात. त्यांच्या व्हिडिओला लाखो व्हिव्ह्युज मिळतात. पेड प्रमोशन तसेच जाहिरातींच्या माध्यमातून ते कोट्यावधींती कमाई करतात. 

फक्त एक प्रश्न विचारुन कमावतात कोट्यावधी रुपये

हॅना आणि तिचा पती सोशल मिडियावर लोकांना फक्त एक प्रश्न विचारुन  कोट्यावधी रुपये कमावतात. हॅना रस्त्यावर आपल्या जवळून जाणाऱ्या लोकांना एकच प्रश्न विचारते 'तुम्ही किती कमावता'. मग हॅना आणि तिचा पती लोकांनी दिलेली उत्तरे रेकॉर्ड करतात आणि त्यांच्या कामाबद्दल कॅमेरावर सांगतात. याचा व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करतात. या व्हिडिओच्या माध्यमातून हॅनाने एका वर्षात 8 कोटींची कमाई केली. एका वर्षात सुमारे 10 लाख 43 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 कोटी 67 लाख रुपये कमावले आहेत. दोघांनी सोशल मिडियावर आपल्या कमाईचा खुलासा केला आहे. 

94 लाखांचा जॉब सोडून व्हिडिओ क्रिएटर बनली

व्हिडिओ क्रिएटर होण्याआधी हॅना एका कंपनीत डेटा एनॅलिस्ट म्हणून काम करत होती. 94 94 लाखांचा जॉब सोडून तिने  व्हिडिओ क्रिएटर  बनण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये तिने नोकरी सोडून वेगळा मार्ग निवडला आणि तिला त्यात यश देखील मिळाले.