6 वादळं अन् प्रलय, 2090 मधून आला आणि 2022 ची केली भविष्यवाणी, टाईम ट्रॅव्हल केलेल्या माणसाचा दावा ऐका

आपल्यालाही कुणी सांगितलं की, मी टाईम ट्रॅव्हल करून आलो आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीला वेड्यात काढाल. मात्र असाच काहीसा दावा नुकताच एका व्यक्तीने केला आहे.

Updated: Aug 11, 2022, 04:54 PM IST
6 वादळं अन् प्रलय, 2090 मधून आला आणि 2022 ची केली भविष्यवाणी, टाईम ट्रॅव्हल केलेल्या माणसाचा दावा ऐका title=

Time Travel : आपण असे अनेक किस्से ऐकले असतील किंवा सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यामध्ये अनेकांनी भविष्यात किंवा भूतकाळात टाईम ट्रॅव्हल केल्याचा दावा केलाय. (Time travel ). विविध देश यावर संशोधन देखील करतायत, भविष्यात जाणं शक्य आहे का, भूतकाळात डोकावणं शक्य आहे का? विविध देशांनी यासाठी काहीनाकाही रिसर्च केलाय.  (Is time travel possile 

आपल्यालाही कुणी सांगितलं की, मी टाईम ट्रॅव्हल करून आलो आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीला वेड्यात काढाल. मात्र असाच काहीसा दावा नुकताच एका व्यक्तीने केला आहे. बरं या माणसाने केवळ भविष्यात टाईम ट्रॅव्हल करून आल्याचा दावा केला नाही तर पठ्ठ्याने याच आठवड्यात होणाऱ्या एका घटनेची भविष्यवाणी देखील केली आहे. 

काय आहे या माणसाचा दावा?

या माणसाचं म्हणणं आहे की तो 2090 मधून आला आहे. तो इथवरच थांबला नाही, तर त्याने थेट भविष्यवाणीही केलीये. भविष्यवाणीही केलीये थेट प्रलयाची. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना येत्या 14 ऑगस्टला प्रलय येणार असल्याचं म्हंटलं आहे. या माणसाच्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी प्रलय येणार आहे आणि या प्रलयात अनेक जणांचा जीवही जाऊ शकतो, असं याचं म्हणणं आहे. काहींना या व्यक्तीच्या अशा वक्तव्याने शॉक बसलाय, तर काहींनी याला केवळ अफवा म्हणून सोडून दिलंय. 

time ravel, time travel and prediction

 

6 मोठी चक्रीवादळं 

फेसबुकवर विंडेल नेक्स नामक माणसाचं अकाउंट आहे. त्याचा भविष्यात टाईम ट्रॅव्हल केल्याचादावा आहे. हा माणूस 68 वर्ष पुढे म्हणजेच 2090 मध्ये ट्रॅव्हल करून आलाय असं म्हणतोय. येत्या 14 ऑगस्टला अमेरिकेत 6 मोठी चक्री वादळं दक्षिण कॅरोलाईन भागात धडकणार असल्याचं हा भाकीत करतोय. एकाचवेळी आलेल्या या चक्री वादळांमुळे अनेकांचे प्राण जातील आणि मोठं नुकसान होईल, असंही तो म्हणतोय. लोकांना या घटनेबाबत माहिती देणं, त्यांचे प्राण वाचवणं यासाठी त्याची निवड झाल्याचं त्याच म्हणणं आहे. 

time traveller from 2090 warns world of worst hurricane in coming days SB