लंडन : युनायटेड किंगडममधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक मुलगी लंडनच्या रस्त्यावर टॉपलेस (Topless Woman On London Streets) झाली. टॉपलेस होण्यामागे मुलीने कारण सांगितले की, ती क्लाइमेट चेंज बदलाच्या (Climate Change) विरोधात आहे. त्यामुळे तिला जगभरात टॉपलेस होऊन कामगिरी करायची आहे.
द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या टॉपलेस झालेल्या मुलीचे नाव लॉरा एमहर्स्ट (Laura Amherst) आहे. ती 31 वर्षांची आहे. लॉरा ओपन यूनिवर्सिटीतील राजकारणाची विद्यार्थिनी आहे. हवामान बदलाच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये लॉरा आकर्षणाचे केंद्र आहेत. तिने सांगितले की, यामध्ये पोलिस देखील तिला थांबवू शकत नाहीत.
एक्टिविस्ट लॉराने सांगितले की, तिला आंदोलकांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलायचा आहे. तिला हा संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचवायचा आहे. ती म्हणाली की, मला यामुळे लोकांना दुखवायचं नाही किंवा यामुळे मला आनंद देखील मिळत नाही.
ती पुढे म्हणाली की, मी जे काही करत आहे, तो गुन्हा नाही. तथापि, जे घडतयं ते माझ्या कल्पनेच्या बाहेरचे आहे. मी हे फक्त निदर्शनासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी केले आहे. माझ्यामुळे लोकांचे या आंदोलनाकडे लक्ष जाते आणि त्यामुळे लोकं थोड्याप्रमाणात का होई ना विचार करायला लागतात.
लॉरा म्हणाली की, मी अटक होण्यास तयार आहे. यापूर्वीही अनेक मोठे नेते तुरुंगात गेले आहेत. माझ्यामुळे कामगिरीमध्ये कायद्यात कोणताही अडथळा येणार नाही. मला आंदोलनामुळे लोकांची मानसिकता बदलायची आहे.
लॉरा म्हणाली की, माझे कुटुंब आणि माझे मित्रही मला पाठिंबा देत आहेत. माझा बॉयफ्रेंडही मला साथ देत आहे. जरी तो शर्ट काढून माझ्याबरोबर प्रात्यक्षिकात सामील होत नाही.तरी तो मला या आनंदोलनात पाठिंबा देत आहे आणि माझ्यासाठी हे खूप आह.