लग्नात वराचं सरप्राईज पाहून नववधू आणि पाहूणे भावूक, VIDEO पाहून लोकं करताय कौतूक

सोशल मीडियावर सध्या एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण भावूक झालेत.

Updated: Oct 28, 2022, 07:54 PM IST
लग्नात वराचं सरप्राईज पाहून नववधू आणि पाहूणे भावूक, VIDEO पाहून लोकं करताय कौतूक title=

मुंबई : विवाह हा जीवनातील एक महत्त्वाचा आणि भावनिक क्षण असतो. या निमित्ताने 2 कुटुंब एकत्र येतात. आपलं लग्न खास करण्यासाठी लोकं काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. एका वराने देखील असेच काहीसे केलंय. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पहाल की एका वराने आपल्या वधूला लग्नासाठी डाउन सिंड्रोमने पीडित असलेल्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करून सर्वात मोठे सरप्राईज दिले आहे. हे पाहून अनेक जण भावूक झाले आहेत.

डाऊन सिंड्रोमने पीडित विद्यार्थी अंगठी घेऊन लग्नात प्रवेश करतात, ते पाहून नववधू आश्चर्यचकित होते आणि भावनिक होऊन रडू लागते. वराने दिलेल्या या सरप्राईजने तिथे उपस्थित पाहुणेही भावूक झाले. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ "द फिगेन" ने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'वराने डाऊन सिंड्रोमने पीडित विद्यार्थ्यांना अंगठी आणण्याची जबाबदारी दिली आहे. किती सुंदर.' हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहून लोकं देखील भावूक होत आहेत.